काळादिन, राज्योत्सवच्या पार्श्वभूमीवर निर्णय : मिरवणूक संपेपर्यंत शहरात वाहनांवर निर्बंध
प्रतिनिधी /बेळगाव
काळादिन व राज्योत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दि. 1 नोव्हेंबर रोजी शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतूक वळविण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी 8 पासून मिरवणूक संपेपर्यंत शहरात येणाऱया वाहनांवर निर्बंध असणार आहेत.
गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. मंगळवारी सकाळी 8 पासून प्रमुख मार्गांवरील वाहतूक वळविण्यात येणार आहे. संकेश्वर, कोल्हापूरहून केएलई इस्पितळमार्गे कित्तूर चन्नम्मा चौकाकडे येणारी वाहतूक व वाहने जिना बकुल सर्कलजवळून बॉक्साईट रोडवर वळविण्यात येणार आहेत. हिंडलगा फॉरेस्ट नाका, हिंडलगा गणेश मंदिर, गांधी सर्कल (अरगन तलाव), शौर्य चौक, केंद्रीय विद्यालय क्र. 2, शरकत पार्क, ग्लोब थिएटरमार्गे खानापूर रोडवर वळविण्यात येणार आहेत.
मध्यवर्ती बसस्थानकापासून खडेबाजार मार्गे शनिवार खूटकडे येणारी वाहतूक जिजामाता सर्कल, व्हीआरएल लॉजिस्टिक, जुना पी. बी. रोडमार्गे वळविण्यात येणार आहे. जिजामाता सर्कल, देशपांडे पेट्रोलपंपहून नरगुंदकर भावे चौक, कंबळी खूटकडे येणारी वाहतूक रविवार पेठ, पिंपळकट्टा मार्गे पाटील गल्ली, रेल्वेस्थानक रोडवरून खानापूर रोडवर वळविण्यात येणार आहे.
मध्यवर्ती बसस्थानकापासून संगोळ्ळी रायण्णा सर्कल, राणी चन्नम्मा चौकमार्गे गोवा व खानापूरकडे जाणारी वाहने जुन्या पी. बी. रोडवरून होसूर पिंपळकट्टा, डबल रोड, गोवावेस मार्गे वळविण्यात येणार आहेत व खानापूर, गोव्यातून शहरात येणारी वाहतूक ग्लोब सर्कल, शरकत पार्क, केंद्रीय विद्यालय क्र. 2, शौर्य चौक, गांधी सर्कल, हिंडलगा गणेश मंदिर, हिंडलगा फॉरेस्ट नाका, बॉक्साईट रोड मार्गे जिनाबकुल सर्कलकडे वळविण्यात येणार आहेत. परिवहन मंडळाच्या बसेस हिंडाल्को अंडरब्रीज, कॅन्सर हॉस्पिटल मार्गे कनकदास सर्कलहून बसस्थानकाकडे वळविण्यात येणार आहेत.
मध्यवर्ती बसस्थानकातून अथणी, चिकोडी, कोल्हापूर, संकेश्वरकडे जाणारी वाहने अशोक स्तंभ, कनकदास सर्कल, कॅन्सर हॉस्पिटलकडून राष्ट्रीय महामार्गावर वळविण्यात येणार आहेत. अथणी, चिकोडी, कोल्हापूरहून येणारी वाहने कॅन्सर हॉस्पिटल, कनकदास सर्कलमार्गे बसस्थानकाकडे वळविण्यात येणार आहेत. या मार्गावर चित्ररथ येताना ही वाहतूक मुचंडी गॅरेज, सांबरा अंडरब्रिज, गांधीनगर मार्गे बसस्थानकाकडे वळविण्यात येणार आहे.
मिरवणुकीच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, चन्नम्मा सर्कल, काकतीवेस, शनिवार खूट, गणपत गल्ली, कंबळी खूट, नरगुंदकर भावे चौक, रविवार पेठ, कर्नाटक चौक, पिंपळकट्टा, कलमठ रोड, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, किर्लोस्कर रोड, धर्मवीर संभाजी चौक, यंदे खूट, कॉलेज रोडवर सकाळी 8 पासून मिरवणूक संपेपर्यंत कोणत्याही प्रकारची वाहने उभी करण्यास मनाई आहे. वेगवेगळय़ा मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आल्याचेही पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.