Tarun Bharat

‘तो’ विषय महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नाही

ऑनलाईन टीम / मुंबई :

औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतरण करण्याची मागणी मागील काही दिवसांपासून जोर धरत आहे. त्यावरुन भाजप आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी यासंदर्भातील सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. संभाजीनगरचा विषय महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नसल्याचे टोपे यांनी म्हटले आहे.

Advertisements

टोपे म्हणाले, औरंगाबादला लोक गरजेनुसार आणि सोयीनुसार संभाजीनगर म्हणतात. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचं महाविकास आघाडीच्या अजेंडय़ावर नाही. हे त्या-त्या पक्षाचे अजेंडे असतात. त्यावर माझं व्यक्तिगत मत देणं योग्य नाही. राष्ट्रवादीचा अजेंड्यावर तर हा विषय नाहीच. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे लोक संभाजीनगर म्हणतात. त्यात त्यांना आनंद वाटतो. आज आपल्यासमोर पाण्याचा प्रश्न आवासून उभा राहिला आहे. रस्ते, वीज यासारखेही महत्त्वाचे प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडविण्याकडे आपण लक्ष्य देऊ, असेही टोपे म्हणाले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करु, असे म्हटले होते. आता 14 मेला मुंबईत झालेल्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की, औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करायची गरज काय? आहेच ते संभाजीनगर. नामांतर करायची गरजच नाही. त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जाहीर सभेत शिवसेनेवर हल्ला चढवला होता.

Related Stories

धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा

Rohan_P

नेहरू-वाजपेयी आदर्श नेते; सर्व पक्षांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज – नितीन गडकरी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कोरोनाचे दोन बळी, सहा पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात 9 जणांचा मृत्यू, 225 रूग्ण वाढले

Abhijeet Shinde

नांद्रेयात ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊसाने ज्वारी व हरभरा पीकांना धोका

Abhijeet Shinde

स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये कराडची घसरण

Patil_p
error: Content is protected !!