पुढील सुनावणीला 1 मार्चपासून होणार प्रारंभ
प्रतिनिधी / बेळगाव
पिरनवाडी येथे संगोळ्ळी रायण्णा पुतळा उभारण्यात आल्यानंतर तणाव निर्माण झाला. या तणावाला जबाबदार म्हणून तसेच विरोध केला म्हणून पिरनवाडी येथील 11 जणांवर बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे. गुरुवारी या खटल्यामध्ये चार्जप्रेम करण्यात आले आहे. तर पुढील सुनावणी 1 मार्चला होणार आहे.
संगोळ्ळी रायण्णा यांचा पुतळा उभे करतेवेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोरच हा पुतळा उभे केला आहे. त्याला तीव्र विरोध झाला होता. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी 11 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
आता या खटल्याच्या सुनावणीला जेएमएफसी द्वितीय न्यायालयामध्ये सुरुवात झाली आहे. त्याठिकाणी चार्जफ्रेम झाले आहेत. आता पुढील सुनावणीला सुरुवात होणार आहे. या कार्यकर्त्यांच्यावतीने ऍड. महेश बिर्जे, ऍड. बाळासाहेब कागणकर आणि ऍड. रिचमॅन रिकी हे काम पाहत आहेत.