गोकुळ शिरगाव/वार्ताहर
शारीरिक व मानसिक छळाप्रकरणी विवाहितेची नवरा, सासू, सासरे, ननंद त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. लग्नाच्या वेळी दागिने दिले नाही. संसार सेट दिला नाही. या कारणावरून सतत मारहाण केली जाते. तसेच मानसिक छळ केला जातो. याबद्दल भारती राहुल लोहार (वय 25 मूळ ) मूळ राहणार शेटफळे (ता. आटपाडी, जिल्हा सांगली) सध्या राहणार देसाई मळा हलसवडे (ता. करवीर ) या विवाहितेने आज राहुल हरिदास लोहार नवरा, हरिदास भगवान लोहार सासरा ,दुर्गा हरिदास लोहार सासू ,सर्व राहणार शेटफळे तालुका आटपाडी व ननंद सीमा कावरे या चौघांच्या विरोधात गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास सहायक फौजदार तिवडे करीत आहेत.

