तरुण भारत

बँकेच्या घोटाळाप्रकरणी सुरुवातीला सोळा आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल

प्रतिनिधी/ वाई

हरिहरेश्वर सहकारी बँकेच्या घोटाळाप्रकरणी सातारा आर्थिक गुन्हे शाखेने सुरुवातीला सोळा आरोपींच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

Advertisements

   हरिहरेश्वर सहकारी बँकेत 37 कोटी 46 लाख रुपयांपेक्षा पेक्षा जास्त रकमेचा अपहार झाला .संबंधितांनी संगनमताने बँकेच्या पैशाचा अपहार केला आहे. आरोपींनी स्वतःची अस्तित्वात नसलेली मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवून आपले नोकर- चाकर ,मित्रमंडळी, संबंधित यांच्या नावे बोगस कर्ज प्रकरणे करून बँकेच्या पैशाचा अपहार केल्याचा आरोप दोषारोप पत्रात करण्यात आला आहे. बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या विशेष लेखापरीक्षकांनी 29 जणांवर गुन्हा दाखल असून होता.याप्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने ठोस तपास करुन सहा नव्याने आरोपी निष्पन्न केले तर आठ आरोपींना अटक केली होती.यापैकी बँकेचे संस्थापक नंदकुमार खामकर त्यांचे बंधू रमेश खामकर अर्जुन खामकर बँकेचे व्यवस्थापक रमेश जाधव याशिवाय बँकेला सर्च व मूल्यांकन करून देणारे वकील व इंजिनियर यांनाही अटक करण्यात आली होती.याप्रकरणी सहा आरोपी मयत आहेत. ज्या आरोपींकडून तपास पूर्ण झाला अशा आरोपींना च्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.  अजूनही काही लोकांना ताब्यात घ्यायचे असून त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावा शोधण्याचे काम आर्थिक गुन्हे शाखा करत आहे .या गुह्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने वीस हजार पानांचे दोषारोप पत्र दाखल केले आहे. या  गुह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे उपविभागीय पोलिस अधिकारी मोहन शिंदे करत आहेत.त्यांना  विक्रम कणसे, अजित पवार, संजय मोरे, शफिक शेख, संकेत माने आदींना मदत केली. याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल झाल्याने ठेवीदारांना दिलासा मिळण्यास मदत झाली आहे आरोपींची मालमत्ता जप्तीची कारवाई आर्थिक गुन्हे शाखेने सुरु केली आहे

Related Stories

ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन 26 जानेवारी ऐवजी आता 29 जानेवारीला होणार

Patil_p

‘विधान परिषदे’चा फैसला ऑक्टोबरमध्ये

Abhijeet Shinde

दरोडय़ाचा गुन्हा 48तासात उघड

Patil_p

थकीत एफआरपीप्रश्नी 5 रोजी साखर आयुक्तांना घेराव

Amit Kulkarni

शहरी भागात वॉर्डनिहाय लसीकरण

datta jadhav

कराड तालुक्यातील चार बाधित कोरोनामुक्त

Abhijeet Shinde
error: Content is protected !!