Tarun Bharat

रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे सेवाभावी कार्य कौतुकास्पद -गौरीश धोंड

Charity work of Rotary Club of Vengurla Midtown appreciated -Gourish Dhond

गरजू रुग्णांना घरगुती उपचाराकरीता आवश्यक असलेल्या ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर, व्हिलचेअर यासारख्या वैद्यकीय सेवासाधनऻची मोफत उपलब्धता व्हावी, या उद्देशाने रोटरी वेंगुला& मिडटाऊन सुरू करीत असलेल्या रोटरी सेवा केंद्र’ हे सेवाभावी कार्य कौतुकास्पद असून, वेंगुर्लेतील सर्वसामान्याना लाभ होईल. अशा विविध वैद्यकीय रोटरी प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून, शहर व ग्रामीण भागातील गरजू जनतेसाठी सेवाभावी कार्य वाढवा, यासाठी रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 व गोवा रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून आपले नेहमीच सहकार्य लाभेल. असे प्रतिपादन गोवा रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष व रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 चे माजी प्रांतपाल गौरिश धोंड यांनी केले.


यावेळी त्यांचे समवेत गोवा रणजीपटू जयेश शेट्टी, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश साळगावकर, असिस्टंट गव्हर्नर दिपक बेलवलकर, रोटरी प्रमोशन डिसिसी राजेश घाटवळ, रोटरी वेंगुला& मिडटाऊन प्रेसिडेंट सुनील रेडकर, सेक्रेटरी पंकज शिरसाट, ट्रेझरर नितीन कुलकर्णी, चार्टर प्रेसिडेंट डॉ. राजेश्वर उबाळे, माजी प्रेसिडेंट सदाशिव भेंडवडे, संजय पुनाळेकर, दिलीप गिरप, प्रा. आनंद बांदेकर, गणेश अंधारी, सचिन वालावलकर, सुरेंद्र चव्हाण, नागेश ऊर्फ पिंटू गावडे, योगेश नाईक, अँड. प्रथमेश नाईक, विनय सामंत, दादा साळगांवकर, आनंद बोवलेकर, मुकुल सातार्डेकर, मृणाल परब, दिपक ठाकुर, आशिष शिरोडकर, राजू वजराटकर, प्रा. पिटर रॉड्रिक्स, वसंत पाटोळे, दिलीप शितोळे, अनमोल गिरप, आशुतोष मसुरकर आदी उपस्थित होते.

वेंगुर्ले (वार्ताहर)-

Related Stories

एसटीची कोटय़वधीची मालमत्ता विक्रीस, भाडय़ाने?

NIKHIL_N

रत्नागिरीत कोरोनाचे आणखीन तीन बळी

Archana Banage

रत्नागिरीत मुसळधार, राजापुरात पूर

Patil_p

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना सावधानतेचा इशारा

Abhijeet Khandekar

घरेलू कामगारांच्या खात्यावर आर्थिक मदत जमा

Anuja Kudatarkar

जिल्हा रूग्णालयात मृत महिलेच्या सोन्याच्या बांगड्यांची चोरी

Patil_p