श्री चषक टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : श्री स्पार्ट्स खडक गल्ली आयोजित तिसऱ्या श्री चषक जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत उद्घाटन दिवशी चव्हाटा स्पोर्ट्स, शिव इलेव्हन खानापूर, शिवसेना मुदगा व रॉयल किंग्ज संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन विजयी सलामी दिली. विशाल संगुचे, रोहण खोबरेकर, प्रभाकर पाटील, कपिल कदम यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. व्हॅक्सिन डेपो मैदानावरती आयोजित श्री चषक जिल्हास्तरीय स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पुरस्कर्ते प्रसाद मोरे, कपिल भोसले, जयेश भातकांडे, विजय जाधव नामदेव बिर्जे, विनोद जाधव, अरुण चौगुले, चंदन कुंदरनाड, चंद्रकांत भातकांडे, प्रणय शेट्टी व गल्लीतील पंच मंडळी उपस्थित होते. पाहुण्याच्या हस्ते मैदानाचे व यष्टीचे पूजन करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन सामन्यात सरदार्स वॉरियर्स संघाने 8 षटकात 8 बाद 70 धावा केल्या. रमेशने 33, शेखरने 14 धावा केल्या. चव्हाटातर्फे विशालने 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना चव्हाटा संघाने 7.2 षटकात 4 बाद 72 धावा करुन सामना 6 गड्यांनी जिंकला. जोतिबाने 32 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात जगदंबा हंगरगा संघाने 8 षटकात 2 बाद 66 धावा केल्या. ओमकार पाटीलने नाबाद 23 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना शिवसेनेने 4 षटकात 2 बाद 67 धावा करुन सामना 8 गड्यांनी जिंकला. रोहन खोबरेकरने नाबाद 45 धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात युनायटेड बालाजी संघाने 7.5 षटकात सर्व बाद 74 धावा केल्या. महावीरने 38 धावा केल्या. शिवसेनातर्फे प्रमोदने 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना शिवसेना मुतगाने 7.5 षटकात 6 बाद 75 धावा करुन सामना 4 गड्यांनी जिंकला. प्रभाकर पाटीलने नाबाद 32 धावा केल्या. चौथ्या सामन्यात रॉयल किंग्जने 8 षटकात 4 बाद 93 धावा केल्या. कपिल कदमने 34 धावा केल्या. संडे क्रिकेटर्सतर्फे अवधुतने 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना संडे क्रिकेटर्सने 8 षटकात 8 बाद 74 धावा केल्या. प्रविणने नाबाद 21 धावा केल्या.
शनिवारचे सामने : 1) अलरझा ब वि. प्रेंड्स इलेव्हन स. 9 वा. 2) लकी स्पोर्ट्स वि. बेळगाव वॉरियर्स स. 10.30 वा. 3) श्री स्पोर्ट्स वि. गाझी बॉईज दु. 12 वा. 4) डेपो वॉरियर्स वि. शिवशक्ती स्पोर्ट्स दु. 1 वा. 5) डेपो मास्टर्स वि. निल बॉईज हिंडलगा