नोटिफिकेशन वाढवत आहेत स्ट्रेस
लक्ष विचलित झाल्यावर पुन्हा केंद्रीत करणे अवघड
व्हॉट्सऍपचा फॅमिली गूपचा मेसेज असो किंवा झोमॅटोवरून एखादी ऑफर, फोनवर सोशल मीडिया किंवा अन्य ऍप्सची नोटिफिकेशन्स दर काही मिनिटांनी तुमचे लक्ष विचलित करत आहेत. फोन सायलेंट मोडवर असो किंवा नसो, तुम्ही तुमच्या कामावर एकाग्रपणे काम करू शकत नसल्याचे तज्ञांचे सांगणे आहे.
एका अनुमानानुसार आमही एका दिवसात सरासरी 85 वेळा स्वतःचा फोन चेक करत असतो. याचा अर्थ दर 15 मिनिटांनी एकदा हे घडत असते. म्हणजेच दर 15 मिनिटांमध्ये आमचा मेंदू कामावरून लक्ष हटवत फोनवर केंद्रीत करत असतो. लक्ष सहजपणे विचलित होते, परंतु ते पुन्हा केंद्रीत करणे खूपच अवघड असते. अभ्यास, काम आणि कुटंबासमवेत वेळ घालवताना असा प्रकार होणे योग्य नाही.
दोन प्रकारे होते लक्ष विचलित
ऑस्ट्रेलियाच्या डीकीन विद्यापीठातील मानसशास्त्राच्या वरिष्ठ व्याख्यात्या शॅरेन होरवूड यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. फोनमध्ये वारंवार वाजणारी रिंग दोन प्रकारे माणसांचे लक्ष विचलित करत असते. पहिल प्रकाराला एक्सोजेनेस इंटरप्शन म्हटले जाते. तर दुसऱया प्रकाराला एंडोजेनेस इंटरप्शन म्हटले जाते. फोनवर एखादी नोटिफिकेशन आल्यावर आपण एक्सायटेड होतो, ही उत्सुकता आणि आनंद निर्माण होण्याचे व्यसन माणसाला जडत असते, याला एक्सोजेनस इंटरप्शन म्हटले जाते. एंडोजेनस इंटरप्शनमध्ये व्यक्तीला फोन पुन्हापुन्हा पाहण्याची इच्छा होती. म्हणजेच नोटिफिकेशन आले नसतानाही त्याचे लक्ष कामावरून हटत फोनवर जाते. यामुळे विनाकारण लक्ष विचलित होत असते.
तणाव वाढतोय
वारंवार फोन पडताळून पाहिल्याने लोकांमध्ये तणाव वाढतोय. नोटिफिकेशनवर प्रतिक्रिया न दिल्याने लोक विचलित होतात. त्यांचे लक्ष कामात लागत नाही. त्यांची उत्पादकता कमी होती. एकदा विचलित झाल्यावर पुन्हा कामात लक्ष लागत नी, मग मनात अपराधीपणा आणि नैराश्य वाढत जात असल्याचे होरवूड यांचे म्हणणे आहे.
कसे टाळाल…
ज्या ऍप्सची नोटिफिकेशन्स कामाची नाहीत, त्यांना बंद करा.
रात्री फोन दुसऱया खोलीत ठेवा, यामुळे झोपेत व्यत्यय येणार नाही.
फोन चेक करण्याच्या इच्छेशी लढा, ऍप्स उघडणे आवश्यक आहे का स्वतःलाच विचारा
कमीतकमी 25 मिनिटे कामात लक्ष एकाग्र करा, मग बेक घेऊन फोन चेक करा.