युक्रेनमध्ये रणगाडय़ासोबत दिसल्या युवती : बहुतांश जणीसैनिकांच्या पत्नी
रशियात नर्सच्या वेशात मॉडेल सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सोशल मीडियावर युद्धाचा प्रचार करत आहेत. हा नर्सेस रणगाडय़ांनजीक विविध पोझमध्ये छायाचित्रे काढून घेत त्यांना पोस्ट करत आहेत. त्यांना सिस्टर्स ऑफ व्हिक्टरी म्हटले जातेय. पुतीन यांच्या सैनिकांसोबत त्या मिसळल्या गेल्या आहेत. नर्सेसच्या पोशाखात युक्रेनवरील क्रूर आक्रमणाला प्रोत्साहन देण्यासाठी झेड चिन्हासोबत त्यांना पाहिले गेले आहे.
काही महिला युपेनमध्ये लढत असलेल्या सैनिकांच्या पत्नी आणि प्रेयसी असल्याचा दावा ऑनलाइन पोस्टमध्ये करण्यात आला आहे. पूर्व युक्रेनच्या लुहान्स्क क्षेत्रातील त्यांची छायाचित्रे इन्स्टाग्राम आणि रशियन सोशल मीडिया साइट वीकेवर पोस्ट करण्यात आल्या आहेत. यापूर्वी ईस्टरवेळी त्यांना सैनिकांसाठी केक आणताना पाहिले गेले होते.
या ग्रूपमध्ये एलोना नावाची महिला सामील असून तिचे टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर 30 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या एका पोस्टमध्ये सैनिकांना युद्धासंबंधी आवाहन करण्यात आले होते. युद्ध सर्वात आवश्यक आहे, युद्धात अनेक अडथळे येतील, परंतु आम्हाला थांबायचे नाही, आम्हाला निडर होऊन त्यांना तोंड द्यायचे आहे. कठिण काळ निघून जाईल आणि एका वेळेनंतर सर्वकाही सुरळीत होईल असे तिने स्वतःच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
अभिनेत्री अन् डॉक्टर्सचाही समावेश
सैनिकांचे मनोबल वाढविणाऱयांमध्ये 19 वर्षीय वायलेट मोस्केलेंको देखील आहे, जिचे इन्स्टाग्रामवर 3 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती एक मॉडेल असून तिने लुहान्स्क फॅशन वीकमध्ये भाग घेतला होता. तसेच सौंदर्य स्पर्धेत सामील मारिया ओकोरोकोवा आणि अभिनेत्री अनास्तासिया चेपुरोव्हा यांनीही चीयरलीडर्स म्हणून यात सहभाग घेतला आहे.