Chendavankar Dasavatar Mandal first in district level Dasavatar drama competition
कुणकेरी क्रीडा आणि कला विकास मंडळ आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रित दशावतार स्पर्धेत चेंदवण येथील देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाटयमंडळाच्या महारथी कर्ण या नाटकाने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत खानोली येथील खानोलकर पारंपारिक दशावतार नाटयमंडळाच्या अखेरचा कौरव या नाटकाने द्वितीय क्रमांक तर तेंडोली येथील वावळेश्वर दशावतार नाटयमंडळाच्या वृक्ष विरहीत फळ या नाटकाने तृतीय क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेचा उर्वरीत निकाल पुढीप्रमाणे उत्कृष्ट राजा – उदय रामचंद्र राणे, उत्कृष्ट नारद – सचिन चंद्रकांत हडकर, उत्कृष्ट विनोदी भुमिका – मंगेश आपा साटम, उत्कृष्ट संगीतसाथ – हेळेकर दशावतार नाटयमंडळ (कारिवडे), उत्कृष्ट स्त्रि – भुमिका – विनायक पांडुरंग येरागी, उत्कृष्ट खलनायक – मिलिंद दिनकर नाईक, विशेष भुमिका – महादेव भानुदास मुंडये
ओटवणे / प्रतिनिधी