Tarun Bharat

बुद्धिबळ ऑलिम्पियाड ‘टॉर्च रिले’ गुरुग्राममध्ये दाखल

Advertisements

वृत्तसंस्था/ गुरगांव

फिडेच्या 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड ‘टॉर्च रिले’चे हरियाणातील गुरुग्राममध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. शुक्रवारी या स्पर्धेची क्रीडाज्योत गुरुग्राम शहराचे अतिरिक्त उपआयुक्त विश्राम मीना यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

2022 बुद्धिबळ ऑलिम्पियाडची ‘टॉर्च रिले’ प्रथमच आयोजित केली असून या स्पर्धेच्या क्रीडाज्योतीच्या प्रवासामध्ये ग्रॅण्ड मास्टर पी. गुप्ता तसेच ग्रॅण्डमास्टर हिमांशू शर्मा यांनी आपला सहभाग दर्शविला.

हरियाणाच्या पानिपत शहरापासून या क्रीडाज्योतीच्या प्रवासाला शुक्रवारी प्रारंभ झाला आणि शनिवारी गुरुग्रामच्या शिव नादर स्कूलमध्ये या ज्योतीचे आगमन झाले. पानिपतपासून गुरुग्राम प्रवासामध्ये क्रीडाज्योत ग्रॅण्डमास्टर शर्माने हाताळली. बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेच्या क्रीडाज्योतीचा प्रवास यापूर्वी हरियाणा राज्यातील कुरूक्षेत्र, लेह, जम्मु, श्रीनगर, धर्मशाला, सिमला, चंदीगड, पतियाळा आणि अमृतसर असा झाला आहे. 40 दिवसांच्या कालावधीत ही क्रीडाज्योत आपल्या प्रवासात 75 शहरांना भेट देणार आहे. या क्रीडाज्योतीच्या प्रवासाचे उद्घाटन गेल्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते करण्यात आले होते. चेन्नई जवळील महाबलीपुरम येथे 44 वी विश्व ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धा 28 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. या स्पर्धेच्या जवळपास 100 वर्षांच्या इतिहासामध्ये भारताला पहिल्यांदाच यजमानपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. या स्पर्धेत पुरूष आणि महिलांच्या अशा दोन विभागात सुमारे 343 संघ सहभागी होणार आहेत.

Related Stories

मायदेशातील मालिकेसाठी बीसीसीआयची बैठक

Patil_p

इब्राहिम, शाहिदी, नवीन यांचे अफगाण संघात पुनरागमन

Patil_p

ऑस्ट्रेलियाच्या स्टोईनिसला दुखापत

Amit Kulkarni

पीसीबी अध्यक्षपदी रमीझ राजा

Patil_p

के.श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

फलंदाजीत विराट-रोहित, गोलंदाजीत बुमराह आघाडीवर

Patil_p
error: Content is protected !!