Tarun Bharat

चेतन नरके लोकसभेला उमेदवार असतील, अरुण नरके यांची माहिती

कोल्हापूर प्रतिनिधी

गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके यांचे सुपुत्र चेतन नरके (Chetan Narake) आता लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत. त्यासाठी मोर्चेबांधणी केली असून राष्ट्रवादीकडून ( NCP) उमेदवारी मिळावी यासाठी ते प्रयत्नशील असल्याची घोषणा अरुण नरके (Arun Narke) यांनी आज पत्रकार बैठकीत केली.

पहा Video- चेतन नरके लोकसभेचे उमेदवार असतील-अरुण नरके

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून भाजप आणि शिंदे गटाची उमेदवारी संजय मंडलिक यांना मिळणार हे निश्चित आहे. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने विविध नावे पुढे करण्यात येत आहेत. तर खुद्द पित्यानेच सुपुत्राची उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चेला उधान आले आहे.
सहकार, बँकिंग, दुग्ध व्यवसाय, शेतकरी यासह सर्व घटकांची माहिती असणारा अभ्यासू लोकप्रतिनिधीने संसदेत प्रतिनिधित्व करण्याची गरज आहे. चेतन नरके यांच्याकडे अभ्यास वृत्ती आहे. सहकार बँकिंगचा अभ्यास आहे. या सगळ्या प्रश्नांची लोकसभेत मांडणी करण्यासाठी चेतन सारखा उमेदवार लोकसभेत हवा. म्हणून त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवावी‌ अशी इच्छा व्यक्त केली.

Related Stories

आवाडे, चराटी, पेरीडकर पराभूत

Archana Banage

…तर मला कोथळा काढण्याचा अधिकार

datta jadhav

महाराष्ट्राचे GST चे २४ हजार ३६० कोटी रुपये मिळावे ; अजित पवारांची पंतप्रधानांकडे मागणी

Archana Banage

शेतकऱ्यांचा २६ रोजी राजभवनांना घेराव

Amit Kulkarni

कोल्हापूर जिल्ह्यात कोव्हॅक्सिनची पहिली लस 77 वर्षीय माजी सैनिकाला..!

Archana Banage

कोल्हापूर जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम पुन्हा सुरू

Archana Banage