Tarun Bharat

काँग्रेसवाढीसाठी ‘चेतना यात्रा’

21 रोजी कुंकळळी येथून सुरुवात : 29 रोजी पणजीत सांगता,यात्रेत काँग्रेस नेते लोकांना भेटणार,विविध मतदारसंघांसाठी बैठका

प्रतिनिधी /पणजी

काँग्रेस पक्ष संघटना वाढवून ती बळकट करण्यासाठी गोवा काँग्रेसतर्फे एकूण 8 दिवसांची चेतना यात्रा आयोजित करण्यात आली असून जनतेकडे संपर्क साधण्याचे उद्दिष्ट त्यातून साध्य केले जाणार आहे. पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा आणण्यासाठी आणि सर्वांना एकत्र ठेवण्याच्या हेतूने या यात्रेचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली. काल मंगळवारी पणजीत काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कुंकळळीतून यात्रेची सुरुवात

पाटकर म्हणाले की, 21 एप्रिलपासून कुंकळळी येथून चेतना यात्रेची सुरुवात होणार असून 29 एप्रिल रोजी पणजीत तिची सांगता करण्यात येणार आहे. सदर यात्रेच्या निमित्ताने सर्व गोमंतकीयांकडे काँग्रेस पक्षाने पोहोचण्याचा निर्धार केला असून 3 ते 4 विधानसभा मतदारसंघांची एकत्रित बैठक यात्रेतून केली जाणार आहे.

काँग्रेस नेते लोकांना भेटणार

पणजीपासून लांब अंतरावर असलेल्या विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते, लोक, हितचिंतक यांना पणजीत येऊन भेटणे, चर्चा करणे शक्य होत नाही म्हणून काँग्रेस पक्षाचे नेते, आमदार, पदाधिकारी यात्रेतून विविध मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. लोकांना भेटणार असल्याचे पाटकर यांनी नमूद केले.

विविध मतदारसंघांसाठी बैठका

वेळ्ळी, कुंकळ्ळी, केपे या तीन मतदारसंघासाठी कुंकळळी येथे 21 एप्रिल रोजी सकाळी 10 ते दुपारी 12.30 पर्यंत बैठका होणार आहेत. नंतर दुपारी 3 ते 6 या वेळेत कुडचडे, सावर्डे, सांगे या तीन मतदारसंघांची बैठक कुडचडे येथे होणार आहे. कुंभारजुवे व प्रियोळ या दोन मतदारसंघासाठी 22 एप्रिल रोजी सकाळी 10 ते दुपारी 12.30 पर्यंत कुंभारजुवेत बैठक घेतली जाणार असून म्हापसा, थिवी, हळदोणासाठी दुपारी 3 ते 6 या वेळेत उत्तर गोवा काँग्रेस कार्यालय, म्हापसा येथे बैठक होणार आहे. काणकोण येथे 23 एप्रिल रोजी सकाळी 10 ते दुपारी 12.30 व नंतर दुपारी 3 ते 6 या वेळेत फोंडा येथे फोंडा, शिरोडा, मडकई मतदारसंघांची बैठक होईल. 25 एप्रिल रोजी कळंगूट येथे सकाळी साळगाव, शिवोली – कळंगूटसाठी तर सायंकाळी मांद्रे येथे पेडणे – मांद्रे करीता बैठका होतील. नुवे, कुठ्ठाळीसाठी 26 एप्रिल रोजी सकाळी कुठ्ठाळीत तर दुपारी मुरगांव – वास्को, दाबोळीसाठी दुपारी मुरगांवात बैठक घेतली जाईल. मडगाव, फातोर्डा, नावेली, बाणावली, कुडतरी या 5 मतदारसंघांसाठी 27 एप्रिल रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत पूर्ण दिवस दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस कार्यालयात बैठका होतील.

डिचोली, सांखळी, मयेसाठी 28 एप्रिल रोजी सकाळी डिचोली येथे तर दुपारी वाळपई, पर्येसाठी वाळपईत बैठका होणार आहेत. तिसवाडीतील 4 मतदारसंघासाठी म्हणजे सांतआंद्रे, सांताक्रूझ, ताळगांव, पणजी व पर्वरी करीता पणजी काँग्रेस भवनात पूर्ण दिवस 29 एप्रिल रोजी बैठका होतील, अशी माहिती देण्यात आली.

Related Stories

सत्तरीतील जनता हीच माझी शक्ती

Patil_p

कोकणीतून नामफलक लावण्याचा कारवार नगरपालिकेचा ठराव

Amit Kulkarni

बोरी स्वामी विवेकानंद महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात

Amit Kulkarni

म्हापसा पार्किंग प्रश्नी विरोधक आक्रमक

Amit Kulkarni

गोवा षष्ठय़ब्ध्दी सोहळ्य़ास राष्ट्रपतींची खास उपस्थिती

Patil_p

गोवा नेतृत्व बदलण्याचा विचार नाही

Amit Kulkarni