Tarun Bharat

येळ्ळूरच्या कुस्ती मैदानाला छत्रपती मालोजीराजे उपस्थित राहणार

Advertisements

कोल्हापुरात कार्यकर्त्यांनी भेट घेऊन दिले निमंत्रण

प्रतिनिधी / येळ्ळूर

यंदाच्या येळ्ळूरच्या महाराष्ट्र कुस्ती मैदानाला कोल्हापूरचे छत्रपती मालोजीराजे भोसले हे उपस्थित राहणार आहेत. कोल्हापूर येथे येळ्ळूर कुस्ती मैदानाचे कार्याध्यक्ष प्रदीप देसाई यांच्यासह शिवाजी सुंठकर आणि महेश टंकसाळी यांनी त्यांची भेट घेऊन निमंत्रण दिले.

कोरोनामुळे दोन वर्षे येळ्ळूरच्या कुस्ती मैदानामध्ये कुस्त्या झाल्या नव्हत्या. मात्र, यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने कुस्त्यांचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र आखाडा मैदानाच्या पदाधिकाऱयांनी आतापासूनच पैलवान तसेच इतर मान्यवरांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.

यावषीचे कुस्ती मैदान लाखेंच्या संख्येने भरविण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील पैलवानांच्या कुस्त्यांचे नियोजन केले जाणार आहे. दक्षिण भारतातील एक मोठा आखाडा म्हणून या मैदानाकडे पाहिले जाते. आता विविध मान्यवरांना आमंत्रण देण्यात येत आहे. कार्यकर्त्यांनी जोमाने कुस्ती मैदान भरविण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.

Related Stories

चलवेनहट्टी क्रॉसजवळ चेकपोस्टची उभारणी

Amit Kulkarni

तब्बल 13 लाखाचा दारूसाठा जप्त

Amit Kulkarni

कर्नाटकातील ओमिक्रॉन प्रकरणांपैकी 92% बेंगळूरमध्ये; 84% सक्रिय

Sumit Tambekar

श्रावण सोमवार

Patil_p

युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी जपली सामाजिक बांधिलकी

Amit Kulkarni

येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी उद्धव कांबळे

Patil_p
error: Content is protected !!