‘राजर्षी शाहूंची वाड्.मयीन स्मारके’ ग्रंथ लवकरच शाहूप्रेमींच्या भेटीला : प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांचा शाहूसंकल्प : जूनमध्ये प्रकाशन
संजीव खाडे/कोल्हापूर
लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या कार्य, कर्तृत्वावर गेल्या शंभर सव्वाशे वर्षांत असंख्य पुस्तके, ग्रंथांची निर्मिती झाली. त्यातून शाहूंच्या समर्पित जीवन, कार्यावर प्रकाश पडला. त्यांच्या कार्याचे विविध पैलू शाहूप्रेमींपुढे, बहुजन समाजापुढे आले. आजही शाहूंच्या कार्यावर संशोधन, अभ्यास सुरू आहे. जुन्या पिढीतील संशोधकांनी केलेल्या संशोधनानंतर आता नव्या पिढीतीला शाहू नावाच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाचा शोध घ्यावसा वाटत आहे. त्यातून युवा संशोधक, अभ्यासक पुढे येत आहेत. राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीचे औचित्य साधून शाहूंच्या विचार आणि कार्याचे अभ्यासक, संशोधक प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांनी अनोखा गंथ शाहूंप्रेमींच्या भेटीस आणण्याचे निश्चित केले आहे. ‘राजर्षी शाहूंची वाड्.मयीन स्मारके’ नावाचा हा गंथ अनोखा ठरणार आहे. यामध्ये शाहूंवर तब्बल 160 ते 165 अशा विविध लेखक, साहित्यिकांनी लिहलेल्या गंथांची, पुस्तकांचा समावेश आहे.
प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांची ओळख अर्थशास्त्राचे प्राध्यापक, अर्थतज्ञ आणि प्राचार्यपद भूषविलेले शिक्षण क्षेत्रातील मोठे व्यक्तीमत्व. सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग असतो. राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन, कार्य, धोरण, नीतीवरही त्यांनी ‘राजर्षी शाहूंची अर्थनीती’, ‘बालकल्याणाचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज’, ‘बहुजनांचे भाग्यविधाते राजर्षी शाहू महाराज’ असे त्यांचे तीन ग्रंथही प्रकाशित झाले आहेत. शाहूंचा अभ्यास करताना त्यांना वेगळी कल्पना सूचली. त्यातून ‘राजर्षी शाहूंची वाड्.मयीन स्मारके’ नामक ग्रंथाची निर्मिती करण्याचा संकल्प त्यांनी सोडला. आजवर गेल्या शंभर सव्वाशे वर्षांत शाहू महाराजांवर विविध लेखकांनी पुस्तके, गंथ लिहिले आहेत. शाहूंच्या जीवन, कार्यातील पैलूंवर प्रकाशझोत टाकला आहे. अशा सर्व ग्रंथ, पुस्तकांची ओळख, माहिती एकाच गंथाच्या माध्यमातून देण्याचा प्राचार्य डॉ. पवार यांचा हा शाहूसंकल्प आहे. यासाठी त्यांनी शाहूकाळ, शाहूउत्तर काळ आणि विद्यमान काळ यातील सर्व पुस्तके, गंथांचे संदर्भ दिले आहेत. आता पर्यंत त्यांचे 153 पुस्तके, ग्रंथांची माहिती लिहून पूर्ण झाली आहे. ही संख्या 160 ते 165 गंथ, पुस्तकांपर्यंत जाईल, असे प्राचार्य डॉ. पवार सांगतात.
दुर्मीळ आणि मान्यवरांच्या ग्रंथ, पुस्तकांचा समावेश
‘राजर्षी शाहूंची वाड्.मयीन स्मारके’ या गंथात दुर्मीळ, मान्यवरांच्या गंथ, पुस्तकांची तीन पृष्ठांत ओळख करून दिली आहे. त्यामध्ये गंथ, पुस्तकाचे नाव, मूल्य, प्रकाशन वर्ष, लेखक, लिखाणाचा पैलू यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. 25 फेब्रुवारी 1885 मध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या दत्तक विधानाची माहिती देणाऱ्या हेडमास्तर सदाशिव महादजी देशपांडे लिखित श्रीमन्महाराज शाहू छत्रपती सरकार करवीर यांच्या दत्तकविधानाची हकीकत 1885 नामक पुस्तकाबरोबर दिवाण बहाद्दूर अण्णासाहेब लठ्ठे, कृ. गो. सूर्यवंशी, डॉ. एस. एस. भोसले, प्रा. न. र. फाटक, वासुदेव आत्माराम लाटकरशास्त्री, धनंजय कीर, तु. बा. नाईक, कॉ. गोविंद पानसरे, भाऊसाहेब पवार, दत्ताजीराव कुरणे, श्याम येडेकर, अॅड. द. रा. बगाडे, स्काऊट महर्षि हिंदूराव कृ. साळुंखे, भाई माधवराव बागल, जयसिंगराव पवार, शाहूकार डॉ. रमेश जाधव, इंद्रजित सावंत, प्रा. नानासाहेब साळुंखे, तोफखाने या लेखकांसह इतर लेखकांच्या पुस्तकांचा, गंथाचा समावेश आहे.
विविध मान्यवर लेखकांनी आपल्या अभ्यासू लेखनीतून राजर्षी शाहू महाराजांच्या विचारकार्याचे जे पैलू गंथ, पुस्तकातून मांडले आहेत. ते नव्या पिढीला, अभ्यासकांना एकाच गंथात ओळख व माहितीरूपाने मिळावेत, यासाठी ‘राजर्षी शाहूंची वाड्.मयीन स्मारके’ या गंथाचा प्रपंच केला आहे. जून महिन्यात शाहू जयंती दिनी प्रकाशनाचे नियोजन आहे. -प्राचार्य डॉ. जे. के. पवार, कोल्हापूर