वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांची अनोखी कलाकृती
सिंधुदुर्ग / प्रतिनिधी–
आरवली- सोन्सुरे येथील वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी एक अनोखी कलाकृती सादर केलीये . त्यांच्या घराच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या खडीचा वापर करून त्यांनी त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचे देखणे रूप साकार केलेय. वाळू शिल्पकार असलेले रविराज चिपकर यांनी स्टोन आर्ट साकारून कमाल केलीये . त्यामुळे त्यांच्या या कलाकृतीसाठी सोशल मिडीयावर त्यांच्या चाहत्यांकडून कंमेन्ट्सचा पाऊस पडताना दिसतोय.