Tarun Bharat

छत्तीसगड काँग्रेसमधील धूसफूस चव्हाटय़ावर

वृत्तसंस्था/ रायपूर

छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे प्रचंड बहुमताचे सरकार असूनही तेथे पक्षांतर्गत मतभेद उफाळून आल्याचे दिसून आले आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याविरोधात कॅबिनेट मंत्री टी. एस. सिंगदेव यांनी बंड पुकारले असून लवकरच ते दिल्लीत येऊन भेट घेणार आहेत. त्यांना प्रत्युत्तर म्हणून बघेलही लवकरच दिल्ली दौरा करतील, अशी शक्मयता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

सहा महिन्यांपूर्वीही या दोन नेत्यांमध्ये असाच वाद उफाळून आलेला होता. मात्र, दिल्लीतील पक्षश्रे÷ाrंनी यशस्वी मध्यस्थी करत पक्षांतर्गत मतभेदांवर पांघरुण घातले होते. तथापि, आता टी. एस. सिंगदेव कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केले आहे.

16 जुलैला सिंगदेव यांनी आपल्या एका विभागाच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. अद्यापही त्यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच वैद्यकीय शिक्षण, वीस कलमी कार्यक्रमाचे क्रियान्वयन आणि क्यापारी कर विभाग इतकी खाती आहेत. तथापि, एका खात्याचा राजीनामा देऊन त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. सिंग आणि बघेल यांच्यात पूर्वीपासून राजकीय बेबनाव आहे. 2018 मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला प्रचंड विजय मिळाल्यानंतर सिंग यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. तथापि, पक्षश्रे÷ाrंचा कौल बघेल यांना मिळाला. तेव्हापासून सिंग संधीची वाट पाहात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अडथळय़ांमुळे आपण आपली विकासात्मक ध्येये पूर्ण करू शकत नाही, अशी व्यथा त्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकारांसमोर व्यक्त केली होती.

सोनिया गांधींकडे सूत्रे

छत्तीसगड काँग्रेसमधील मतभेद संपविण्याची जबाबदारी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या हाती घेतली असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी दोन्ही प्रतिस्पर्धी नेत्यांबरोबर गेल्या चार दिवसांत दोन वेळा टेलिफोनवरून चर्चा केली आहे. तसेच दोघांनाही दिल्लीला बोलावून घेऊन समेट घडविण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आताही त्याच निर्णायक भूमिका बजावणार आहेत.

Related Stories

एरोस्पेस क्षेत्रात अव्वल होण्याची राज्याकडे क्षमता

Patil_p

कोरोना रुग्णसंख्येत भारत तिसऱया स्थानी

Patil_p

गुड न्यूज : अरविंद केजरीवाल यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

Tousif Mujawar

राहुल गांधींसोबतच्या ‘त्या’ फोटोवर संजय राऊत म्हणाले…

Archana Banage

लालू यादवांच्या निकटवर्तीयाला अटक

Patil_p

भारताची आरोग्य यंत्रणा कोलमडल्याची कबुली

Patil_p