प्रतिनिधी/ बेंगळूर
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे त्यांचा दिल्ली दौरा रद्द झाला आहे. बोम्माई शनिवारी सकाळी 11.30 वाजता बेंगळूरहून दिल्लीला रवाना होणार होते. मात्र, कोरोनामुळे त्यांचा दोन दिवसांचा दिल्ली दौरा रद्द झाला आहे. सध्या ते आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांनी स्वतः यासंबंधी ट्विट करून माहिती दिली आहे. आपल्या कोविड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आपल्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.