Tarun Bharat

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना तलवार देऊन काणकोण मध्ये भव्य सत्कार

काणकोणात प्रदूषण विरहित प्रकल्प राबविणार

प्रतिनिधी /काणकोण

काणकोण नागरीक समिती आणि काणकोण भाजप मंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा नागरी सत्कार करताना त्यांच्या हातात तलवार देऊन गोव्याचे रक्षण आणि सुरक्षितता सांभाळण्याचे आणि एका प्रकारे काणकोण मतदारसंघातील सर्वांगिण विकासाचे आव्हान दिले आहे.

या सत्काराला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काणकोण मतदारसंघात प्रदूषण विरहित शैक्षणिक प्रकल्प आणण्यात येणार असून काणकोण स्वंयपूर्ण होण्यासाठी सरकार सर्व प्रकारचे सहकार्य करेल, काणकोणच्या बेरोजगार युवकांना आवश्यक असलेले प्रशिक्षण देतानाच सभापती रमेश तवडकर यांना पूर्ण पाठिंबा देईल असे मत व्यक्त केले.

  काणकोण मतदारसंघात शैक्षणिक हब बनविण्याचे आपले स्वप्न असून आपल्याला मंत्रीपदा ऐवजी सभापतीपद मिळाले म्हणून कार्यकर्त्यांनी नाराज न होता ताठ मानेने काम करण्याचा सल्ला यावेळी सभापती रमेश तवडकर यांनी दिला.

यावेळी सभापती रमेश तवडकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याना जिरे टोप घालून तलवार भेट देण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार कृष्णा साळकर, उल्हास तुयेकर, गणेश गावकर यांचा सभापतींच्या हस्ते तर सभापती रमेश तवडकर यांचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आमोणे येथील बलराम निवासी शाळेतील शिक्षक कर्मचाऱयांच्या गानवृंदाने सादर केलेल्या स्वागत गीता नंतर पारंपारिक समई प्रज्वलित करून या भव्य सोहळय़ाची सुरूवात झाली. त्याला खास महाराष्ट्रातून आणलेल्या पिंगुळी कलाकारांचे तुतारी वादन आणि वाद्याने रंगत आणली. दत्ता गावकर, चंदा देसाई, दिवाकर पागी, किशोर शेट, रमाकांत ना. गावकर , मनुजा ना. गावकर,  सारा देसाई, नगराध्यक्ष सायमन रिबेलो, यांची भाषणे झाली.

या कार्यक्रमाला भाजपचे संघटन मंत्री सतीश धोंड, माजी पोलिस प्रमुख संतोबा देसाई, ज्ञान प्रबोधिनी मंडळाचे अध्यक्ष चेतन देसाई, दक्षिण गोवा भाजपाचे उपाध्यक्ष महेश नाईक, सर्वानंद भगत, काणकोण भाजप मंडळ प्रमुख विशाल देसाई, सचिव विशांत गावकर, खोला जिल्हा पंचसदस्य शाणू वेळीप, पैंगीणच्या माजी जिल्हा पंचायत सदस्या डॉ. पुष्पा अय्या, महिला मोर्चाच्या अध्यक्षा विंदा सतरकर, उपस्थित होत्या. या मेळाव्याला उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांची खास भोजन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती.

Related Stories

आझादी का अमृत महोत्सवा निमित्त लोकमान्य राष्ट्रोत्सव ठेव योजना प्रारंभ

Amit Kulkarni

धार्मिक स्थळ कायदा रद्द होण्यासाठी दबाव वाढवा

Amit Kulkarni

राज्यातील रस्ते दुरुस्त करा अन्यथा आंदोलन करणार

Amit Kulkarni

केजरीवाल, सावंत यांच्यात वादंग

Amit Kulkarni

म्हापशात मलनिःस्सारण प्रकल्प बनला पांढरा हत्ती- राहूल म्हांबरे

Amit Kulkarni

म्हापशाच्या चौफेर विकासासाठी सातव्यांदा निवडून देतील- सुधीर कांदोळकर

Amit Kulkarni