गोव्यातील विविध पायाभूत सुविधांसंदर्भात केली चर्चा
प्रतिनिधी /पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. आणि गोव्यातील विविध पायाभूत सुविधांसंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली.
नितीन गडकरी हे बांबोळी येथील एका रिसॉर्टवर गेले चार दिवस विश्रांतीसाठी आले होते. मुख्यमत्र्यांनी गोव्यातील विविध प्रकल्पांबाबत चर्चा केली. राष्ट्रीय महामार्ग. झुवारी पूल, मोपा विमानतळ इत्यादी अनेक प्रकल्पांची कामे यावर सविस्तर चर्चा केली. गोव्याच्या बाबतीत मंत्री गडकरी हे नेहमीच सकारात्मक राहिलेले आहेत. व केंद्राकडून नेहमीच साहाय्य मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. गडकरी यांनी गोव्याला सर्वक्षेत्रात केंद्राकडून भरीव सहकार्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिले.