मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सीएमओ ऑफिसमध्ये पुजेचे आयोजन
ऑनलाईन टीम / मुंबई
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आपला पदभार स्विकारला. मुख्यमंत्री कार्यालयामध्ये त्यासाठी जय्यत तयारी केली असून पदभार स्विकारण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून सीएमओ कार्यालयामध्ये पुजेचे आयोजन केले आहे.
अनेक नाट्यमय घडामोडीनंतर 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर 4 तारखेला शिंदे- भाजप गटाने विधिमंडळामध्ये आपले बहुमत सिध्द केलं. मंत्रीमंडळाचा विस्तार अजूनही झाला नसला तरी मुख्यमंत्री आज आपला पदभार स्विकारून आपल्या कार्यालयाचा ताबा घेणार आहेत.
मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी आज मुख्यमंत्री कार्यालयामध्ये जय्यत तयारी केली असल्याचे दिसून येते. यासाठी कार्यालयामध्ये तसेच दालनांमध्ये फुलांची सजावट केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दालनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमा लक्ष वेधून घेत आहेत. मंत्रालयाच्या 6 व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांच्या स्वागताप्रित्यर्थ पुजेचे आयोजन केले आहे.
दरम्यान, पावणे अकरा वाजता मुख्यमंत्री शिंदे हे सीएमओ ऑफिसमध्ये दाखल झाले. त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी छ. शिवाजी महारज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन आपला पदभार स्विकारला.