भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आईंचे काल निधन झाले. चंद्रकांतदादांना भेटण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरला येणार आहेत. नवी दिल्लीहून दुपारी २ वाजता मुख्यमंत्री विमानाने कोल्हापूरकडे प्रयाण करतील. सायंकाळी ४ वाजता त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. तिथून ते छत्रपती संभाजी पार्क येथे पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचतील. सायंकाळी ५.१५ वाजता मुख्यमंत्री विमानाने मुंबईकडे रवाना होतील.


previous post