बेळगाव– लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लमा डोंगराला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी भेट देऊन यल्लमा देवीचे दर्शन घेतले . यल्लमा देवीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या डॉ.प्रमोद सावंत यांचे मंदिराच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वागत केले.नंतर देवीच्या उत्सव मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.उत्सव मूर्तीच्या मिरवणुकीत डॉ.प्रमोद सावंत सहभागी झाले होते.मंदिर परिसरात डॉ प्रमोद सावंत यांना बघण्यासाठी आणि त्यांच्या समवेत फोटो काढण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली होती.डॉ.प्रमोद सावंत यांनी देवीचे दर्शन घेऊन आरती करून प्रसाद स्वीकारला. मंदिरा तर्फे शाल,श्री फळ देऊन प्रमोद सावंत यांचा सत्कार करण्यात आला.
Trending
- वाळवा तालुक्याच्या विकासासाठी मताधिक्य द्यावे : खास . धैर्यशील माने
- शेतकरी व महिलांच्या प्रश्नांवर भाजपने बोलूच नये : उमेश आपटे
- रात्रीचा दिवस करून धैर्यशील माने यांना उच्चांकी मतांनी निवडून आणू- प्रकाश आवाडे
- पक्षफोडीची नाराजी मतदानातून उमटेल : मालोजीराजे प्रतिपादन
- दक्षिणोत्तर विकास पर्वामुळे ‘दक्षिण‘ची जनता मंडलिक यांच्या पाठीशी- राजेश क्षीरसागर
- कोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा : दोन लाखावर लोक जमतील
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बेळगाव दौऱ्यात बदल
- दोन भावांचे मृतदेह सापडल्याने खळबळ