Tarun Bharat

महाराष्ट्र आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री घेणार अमित शहांची भेट

महाराष्ट्र आणि कर्नाटक (Maharashtra- Karnatak Border Dispute) राज्यांमधील सीमावादाप्रश्नावर शांतता निर्माण करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा (HM amit Shah) 14 डिसेंबर रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी शुक्रवारी दिली.

महाविकास आघाडीच्या (MVA) खासदारांच्या शिष्टमंडळासह शहा यांची भेट घेतल्यानंतर शिरूरचे लोकसभा सदस्य कोल्हे पत्रकारांशी बोलत होते. बैठकीदरम्यान, एमव्हीए शिष्टमंडळाने शाह यांना सांगितले की महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमा विवाद अशा टप्प्यावर पोहोचला आहे की तो हिंसाचारात उफाळून येऊ शकतो.
त्यावर, शाह यांनी १४ डिसेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची बैठक बोलावली आहे. दोन्ही राज्यांमधील सीमावादावर शांतता निर्माण करण्यासाठी १४ डिसेंबरला महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट गृहमंत्री अमित शाह यांच्याशी होईल. असे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी सांगितले.

Related Stories

ट्रकच्या ठोकरीने दुचाकीस्वार ठार

Amit Kulkarni

देशात होतेय लॉकडाऊनची तयारी? केंद्रीय गृहमंत्री म्हणाले…

datta jadhav

इम्या भाई गॅंगला मोक्का

Archana Banage

भाजपकडून ‘अब्बाजान’ व्यंगचित्राच्या साहाय्याने शरसंधान

Patil_p

सिक्कीम, बिहार, आसाम भूकंपाने हादरले

Patil_p

उदयनराजे उवाच

Patil_p