Tarun Bharat

खंडणी पत्रावर सह्या केलेल्यांची चौकशी करा

मुख्यमंत्र्यांचा डिजीपींना आदेश

पणजी : किनारपट्टीवरील रेस्टॉरंट मालक, हॉटेलवाले यांच्याकडून सरकारच्या नावे कथित खंडणी उकळल्याचा आरोप असलेल्या ‘त्या’ दोघांना चौकशीसाठी बोलावण्याचा आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांना दिला आहे. तक्रारीवर केलेल्या सह्या खऱ्या आहेत की बनावट? हे तपासण्यास त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. असे कृत्त्य खपवून घेतले जाणार नाही, दोषींना कडक शिक्षा केली जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. गोव्यातील काही क्लबच्या मालकांनी बनावट स्वाक्षऱ्या वापरून सावंत सरकारची बदनामी करण्यासाठी केंद्राकडे निवेदन दिले आहे, अशा तक्रारी विविध पोलिसस्थानकात दाखल केल्या आहेत, त्याबाबत मुख्यमंत्र्यांना एका कार्यक्रमात विचारले असता त्यांनील वरील उत्तर दिले.

आपले सरकार स्वच्छ

कळंगुट, कांदोळी, बागा, हणजूण भागातील रेस्टॉरंट मालकांकडून सरकारच्या नावे लाखो ऊपयांची खंडणी उकळण्यात येत असल्याचा आरोप करणारी पत्रे काही व्यावसायिकांनी पंतप्रधान कायार्लयाला लिहिली अहेत. त्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, आपली या प्रकरणात नाहक बदनामी केली जात आहे. आपल्या कुटुंबातील एकाही सदस्याने कधीही सरकारच्या कामात ढवळाढवळ केलेली नाही. आपले सरकार स्वच्छ आहे. काही राजकारणी वैफल्यग्रस्त होऊन बोगस तक्रारी करत आहेत.

नावांचा गैरवापर केल्याची तक्रार

पंतप्रधान कार्यालयाला लिहिलेल्या पत्रात खंडणी मागणाऱ्या ज्या दोघांचा उल्लेख आहे, त्यांची कसून चौकशी करण्यात यावी, असा आदेश आपण दिला आहे. तसेच ज्यांच्या सहीने ही पत्रे पाठिवली गेली आहेत, त्यांनाही बोलावून विचारणा करावी, असे निर्देश पोलीस महासंचालकांना दिले आहेत. हॉटेल व्यावसायिक नंदन कुडचडकर व साहिल अडवलपालकर यांच्या नावाने पंतप्रधान कायार्लयाला पाठिवलेल्या पत्रांवर त्यांच्या नावांचा गैरवापर केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.

Related Stories

साखळीत पक्षाच्या झेंडय़ाखाली संघटीत कार्य करण्याचा काँग्रेसचा निर्धार

Patil_p

सारस्वत विद्यालयाला बार्देश तालुका बुद्धिबळमध्ये दुहेरी यश

Amit Kulkarni

मान्यतेअभावी खर्चाची फाईल सरकारकडे

Amit Kulkarni

खोब्रावाडा कळंगूट हनुमान देवस्थानात आज हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना

Amit Kulkarni

भगतसिंह कोश्यारी यांनी स्वीकारली गोव्याच्या राज्यपालपदाची सूत्रे

datta jadhav

प्रमुख महिला प्रकल्पांना शशिकलाताईंचे नाव लवकरच देण्यात येणार

Patil_p