Tarun Bharat

मुख्यमंत्री पटनायक घेणार पोपची भेट

10 दिवसांच्या विदेश दौऱयावर ओडिशाचे मुख्यमंत्री

वृत्तसंस्था / भुवनेश्वर

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे 10 दिवसांच्या विदेश दौऱयावर जाणार आहेत. विदेश दौऱयादरम्यान पटनायक व्हॅटिकनमध्ये कॅथोलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिसन यांना भेटणार आहेत. भारतातील एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री पोपना भेटण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. निर्धारित कार्यक्रमानुसार पटनायक रविवारी दिल्लीत पोहोचले असून सोमवारी ते रोमसाठी रवाना होणार आहेत. 29 जून रोजी ते दुबईत थांबणार असून 30 जूनला मायदेशी परतणार आहेत.

Il Presidente della Repubblica Sergio Mattarella incontra Papa Francesco

रोममधील संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक अन्न कार्यक्रम (डब्ल्यूएफपी) मुख्यालयाचा  दौरा करण्यासह रोम आणि दुबईमधील ओडिशाशी संबंधित लोकांना भेटणार आहेत. दुबईतील गुंतवणुकदारांशी ते चर्चा करणार आहेत. मागील 10 वर्षांमध्ये पटनायक यांचा हा पहिलाच विदेश दौरा असणार आहे. तर 22 पेक्षा अधिक वर्षे काळात मुख्यमंत्री म्हणून दुसरा विदेश दौरा असणार आहे. पटनायक यांनी यापूर्वी 2012 मध्ये लंडनचा दौरा केला होता.

Related Stories

वुहानचे नागरिक मायदेशातच ‘अस्पृश्य’

Patil_p

दोन-तीन दिवसात मंत्रिमंडळ विस्तार?

Patil_p

प्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

Tousif Mujawar

केरळमध्ये भूस्खलन; 13 जणांचा मृत्यू

datta jadhav

धक्कादायक : 2500 रुपयात कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह मिळेल

Tousif Mujawar

पंजाबमध्ये कोरोना बाधितांची संख्या 6907 वर

Tousif Mujawar