Tarun Bharat

Satara; मुख्यमंत्र्यांचे साताऱ्यात मंत्री देसाई यांच्याकडून स्वागत; जेसीबीमधून पुष्पवृष्टी

Advertisements

सातारा : प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. मुख्यमंत्री सातऱ्यात पोहोचताच त्यांचे त्यांचे स्वागत मंत्री शंभूराज देसाई यांनी शिरवळ येथिल सारोळा ब्रिज येथे पुष्पगुच्छ देऊन केले.

तसेच मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे सातऱ्यात प्रथमच आल्याने साताऱ्यातील शिंदे समर्थकामध्ये मोठा उत्साह दिसत होता. मुख्यमंत्री हे स्वता मुळचे साताऱ्याचे आसल्याने त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. आगमनावेळी जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते. यावेळी जिल्हा पोलीस दलाकडून मुख्यमंत्री महोदयांना मानवंदना देण्यात आली.

Related Stories

सातारा : शेंद्रेत ‘जनता कर्फ्यू’ला उत्स्फुर्त प्रतिसाद

Abhijeet Shinde

कोयनेची सत्तरी; वेग मंदावला

Patil_p

सातारा : केंद्रीय मंत्री दानवे चक्क शेतकऱ्यांच्या शेतात

Abhijeet Shinde

शहरात फिरत्या पथकांकडून कोरोना चाचणीला वेग

datta jadhav

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ- ना. दरेकर

Abhijeet Shinde

जिह्यातील मराठी पत्रकार परिषदेचे कार्य राज्यात आदर्शवत

Patil_p
error: Content is protected !!