प्रतिनिधी /पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आज सायंकाळी येथून उत्तराखंडला रवाना होणार असून त्यानंतर ते दिल्लीत पोहोचणार आहेत. आपल्या दोन दिवसांच्या दिल्ली द्रौयानंतर ते गोव्यात परततील. दरम्यान प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे हे सोमवारी गुजरात दौऱ्यावर जाणार असून तेथून ते देखील दिल्लीला पोहोचतील. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या चिरंजीवाच्या विवाहानिमित्त आयोजित स्वागत समारंभात ते सहभागी होतील. दोन्ही नेत्यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत मात्र गोव्यात राजकीय गूढ वाढलेले आहे.