Tarun Bharat

हा शिंदे गद्दार नाही, खुद्दार आहे; सत्तेसाठी मिंधा झालो नाही

ऑनलाईन टीम / तरुण भारत : 

मला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. सामान्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याचा अजेंडा मी घेतला आहे. हा शिंदे गद्दार नाही, खुद्दार आहे. शिंदेच्या रक्तात बेईमानी नाही. तुमच्यासारखा सत्तेसाठी मिंधा झालो नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. 

खेडच्या गोळीबार मैदानावर आयोजित सभेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. ते म्हणाले, घरात बसून आदेश देणारा मी मुख्यमंत्री नाही. राष्ट्रवादीसोबत जाऊन त्यांच्या घशात जिल्हा परिषद घातल्या. रामदास कदमांनी कोकणात शिवसेना मोठी केली कीर्तीकर आणि बाळासाहेबांसोबत शिवसेना मोठी केली. आज तुम्ही त्याच कदम आणि कीर्तीकारांना संपवण्याचा प्रयत्न करत आहात. अडीच वर्ष वर्षावर प्रवेश बंद होता. ज्यांच्यावर टीका केली त्यांच्यासोबत सत्तेसाठी गेलात. अशोक चव्हाण यांनी शेण खाल्लं अशी टीका ठाकरे यांनी केली होती. तुम्ही त्यांच्यासोबत मिळून काय काय खात होता, असा सवालही शिंदे यांनी यावेळी केला. 

आम्ही गाजराचा हलवा दिला. तुम्ही आम्हाला गाजर दाखवले. कार्यकर्ता मोठा झाला की पोटदुखी होते. ठाण्याचा भगवा उतरू नये, म्हणून मी बाहेर पडलो. दरवाजे उघडे ठेवा सगळे जातील, तुम्ही दोघेच राहाल. ‘हम दो हमारे दो’, ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ असा टोलाही त्यांनी लगावला.

Related Stories

‘ पक्ष मजबुती ’ मध्ये कोल्हापूर राष्ट्रवादी आघाडीवर

Archana Banage

पुंछमध्ये चकमक; दोन पोलिसांसह एक जवान जखमी

datta jadhav

झी मराठी विरोधात स्वराज्य संघटना आक्रमक; पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन दिला अखेरचा इशारा

Abhijeet Khandekar

भारतात डिसेंबरअखेर ‘कोव्हिशिल्ड’च्या 10 कोटी लस उपलब्ध होणार

datta jadhav

अफगाणिस्तान : अन्नासाठी लोकांचा अनन्वित छळ

Patil_p

आम्हीही शंख वाजवला, आता सरकारचा घंटा वाजणार : राकेश टिकैत

Archana Banage