Tarun Bharat

मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट

ऑनलाईन टीम/तरुण भारत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची आज भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांची भेट होण्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानी भेट घेतली. यांनतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी आंबेडकरांची घेतलेली भेट ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटले आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर येत्या २० तारखेला एकाच मंचावर येणार आहेत. परंतु ठाकरे-आंबेडकर भेट होण्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठा डाव टाकत आजच आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानी भेट घेतली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या ठिकाणी संग्रहायल असल्यामुळे त्याची व्हीजीट देखील मुख्यमंत्री करणार आहेत. त्यानंतर इंदू मील येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची पाहणी करणार आहेत. परंतु ठाकरे-आंबेडकर येत्या २० नोव्हेंबरला एकत्र येणार असून आगामी काळात राजकीय समीकरणं बदलणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

प्रकाश आंबेडकरांची सदिच्छा भेट
आंबेडकरांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, “मी प्रकाश आंबेडकर यांची सदिच्छा भेट घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पवित्र्य झालेली ही वास्तू पाहिली. यात कोणतंही राजकारण नाही. कृपया गैरसमज करून घेऊ नका. ही निव्वळ आणि निव्वळ सदिच्छा भेट होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशाचं भूषण आहे. त्यांचं वास्तव्य असलेली ही वास्तू पाहिली आणि सदिच्छा भेट दिली.” ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

भाजपबरोबर जाणार नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रकाश आंबेडकर यांची त्यांच्या राजगृह एका निवासस्थानी भेट घेतली. यांनतर माध्यमांशी संवाद साधताना पत्रकारांनी आंबेडकर यांना भाजपबरोबर जाणार का? असा सवाल केला. यावेळी आंबेडकर यांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपबरोबर जाणार नाही, असं त्यांनी सांगितलं .

Related Stories

बिहार विधानसभा : थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात

datta jadhav

माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही – मंत्री मुश्रीफ

Archana Banage

अभियंता कौस्तुभ गोवेकर यांचे हैद्राबादला निधन

Anuja Kudatarkar

राज्यातील घटनांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का बोलत नाहीत? : देवेंद्र फडणवीस

Tousif Mujawar

ऊसतोड मजूराच्या मुलावर बिबट्याचा हल्ला

Abhijeet Khandekar

क्रांतिकारक हुतात्मा राजगुरू यांना पोवाड्यातून वंदन

Tousif Mujawar