ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आत्मघाती स्फोट घडवून जीवे मारण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यानुसार पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्री शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर एक धमकीचा निनावी फोन देखील आला होता. मुख्यमंत्री शिंदे यांना आधीच माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. सरकारने पीएफआय या संघटनेवर बंदी घातली असून, त्याचा या प्रकरणाचा काही संबंध आहे का?याचा तपास पोलीस करत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
अधिक वाचा : शोपियां चकमकीत दहशतवाद्याला कंठस्नान