Tarun Bharat

मुख्यमंत्री ठाकरे मंत्रालयातील सर्व सचिवांना संबोधित करणार

ऑनलाईन टीम/तरुण भारत

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात असून आज १२.३० वाजता ते मंत्रालयातील सर्व सचिवांना संबोधित करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्या आधी सर्व सचिवांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानणार आहेत. त्यामुळे बैठकीनंतर मुख्यमंत्री ठाकरे हे राजीनामा देणार का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे हे मंत्रालयातील सर्व सचिवांना दुपारी १२.३० वाजता ऑनलाईनच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. या बैठकीत ते सर्व सचिवांचे आभार माननार आहेत. यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त सचिव आणि प्रधान सचिव हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, कार्यालयीन कामकाजासंदर्भात चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीत जर सर्व सचिवांचे आभार मानले तर ठाकरे राजीनामा देण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कारण ठाकरेंनी कालपासून त्यांच्या एक्झिटच्या दिशेने एक-एक पाऊल पुढे टाकण्यास सुरूवात केली आहे. जनतेला संबोधित करताना मी पद देखील सोडायला तयार आहे. याची पहिली तयारी म्हणून मी माझं शासकीय निवासस्थान सोडतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडलं आणि ते मातोश्री येथे रहायला आले.

Advertisements

Related Stories

कुर्डुवाडी नगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर

Sumit Tambekar

डॉक्टर तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू

Abhijeet Khandekar

कोण आहेत दीप सिद्धू? ज्यांच्यावर होतोय शेतकऱ्यांना भडकवल्याचा आरोप

datta jadhav

खोजनवाडीत घरफोडी; साडेपाच लाखाचा मुद्देमाल लंपास

Abhijeet Shinde

अशिक्षित लोक म्हणजे भारतावरचं ओझं : गृहमंत्री अमित शाह

Abhijeet Shinde

कोल्हापूर : पेठ वडगावात बँकेचे शाखाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!