Tarun Bharat

महाविकास आघाडी सरकार अल्पमतात : नारायण राणे

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

राज्यसभेच्या निकालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister uddhav Thackeray) यांची नाचक्की झाली आहे. ठाकरे सरकार अल्पमतात आलं आहे. त्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. ठाकरेंनी आता राजीनामा द्यावा, असा हल्लाबोल भाजप नेते नारायण राणे (Narayan rane) यांनी केला. आज पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पवार (sanjay pawar) यांच्या पराभवानंतर विरोधक शिवसेनेनवर टीका करताना दिसत आहेत. अजय माध्यमंधी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. राज्यसभेच्या निकालावरून शिवसेनेवर निशाणा साधताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंकडे राजीनाम्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, ‘राज्यसभेच्या निकालामुळे मुख्यमंत्र्यांची नाचक्की झाली आहे. संजय राऊत काटावर आले आहेत. ते आमच्या हातून वाचले. एकूण आघाडीची मते त्यांना मिळाली पाहिजेत, तेवढीही मते त्यांना मिळाली नाहीत.’

पुढे बोलताना राणे म्हणाले की, ठाकरे सरकार अल्पमतात आलं आहे. सत्तेला १४५ मते लागतात. त्यामुळे तुम्ही राजीनामे द्या. नैतिकता असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राणेंनी केली. तसेच बढाया मारणारे स्वतःचेही आमदार वाचवू शकले नाहीत. तुम्ही स्वचःला वाघ समजता, पण तुमची कृती शेळीचीही नाही, असंही टीकास्त्र नारायण राणे यांनी सोडलं.

Related Stories

”मराठा आरक्षणाच्या संदर्भातील आज आलेला निकाल दु:खद आणि निराशाजनक”

Abhijeet Shinde

दिल्ली : बत्रा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी एका डॉक्टरसह आठ जणांचा मृत्यू

Rohan_P

शिवसेनाप्रमुख देशाचे मार्गदर्शक

Abhijeet Shinde

भारताच्या दीक्षा डागरला मूकबधीर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक

datta jadhav

सांगली : वसुलीसाठी तगादा, करगणीतील महिला सावकारवर गुन्हा

Abhijeet Shinde

आज बांबोळी स्टेडियमवर होणार ओडिशा – हैदराबाद यांच्यात लढत

Omkar B
error: Content is protected !!