ऑनलाईन टीम / मुंबई :
खा. नवनीत राणा (navneet rana) आणि आ. रवी राणा (ravi rana) या दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackreay) यांच्या मातोश्री (matoshree) निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा (hanuman chalisa) पठण करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी मातोश्रीबाहेर आणि राणा यांच्या खारमधील घराबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली होती. यामध्ये 92 वर्षांच्या आजीही होत्या. त्यांनी राणा दाम्पत्याला पुष्पा स्टाईलमध्ये “मै झुकेगा नहीं साला” अशा शब्दात इशारा दिला. त्यामुळे शिवसेनेच्या या राणाविरोधी आंदोलनात ‘फायर’ आजीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही या आजींची दखल घेत त्यांना मातोश्रीवर बोलावणं धाडलं आहे.
चंद्रभागा (chandrabhaga) असं या ‘फायर’ आजींचं नाव आहे. आमच्या साहेबांच्या बंगल्यावर येण्याची हिम्मत कशी होतेयं. शिवसेना कधीच घाबरत नाही. आम्हाला बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे. करेंगा, आम्ही डरेंगा नाही, असे म्हणत या आजींनी पुष्पा स्टाईल ‘”मै झुकेगा नहीं साला”‘ म्हणत राणा दाम्पत्याला इशारा दिला. या आजीचा जोश पाहून शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला होता.शिवसेना कार्यकर्त्यांनी देखील “रवी राणा कायर आहे, आजी आमची फायर आहे” अशी घोषणाबाजी केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या आजींची दखल घेत त्यांना मोतोश्रीवर बोलावून घेतलं आहे.