Tarun Bharat

जत बाबत मुख्यमंत्र्यांची घोषणा दिशाभूल करणारी; माजी आमदारांचा आरोप ; पहा काय म्हणाले…

शिंदे फडणवीस सरकारला भाजप माजी आमदारांचा घरचा आहेर

जत, प्रतिनिधी

जतच्या वंचित 65 गावांसाठी राबविण्यात येणाऱ्या म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल 1900 कोटी रुपये देण्याची केलेली घोषणा आणि जानेवारीत काम सुरू करू असे दिलेले आश्वासन हे धादांत खोटे आहे .मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य दिशाभूल करणारे असल्याचे टीका जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार बैठकीत केली आहे.

विलासराव जगताप म्हणाले, काल सह्याद्री वर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली बैठक ही म्हैसाळ योजनेसाठी नव्हतीच, जत तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असणाऱ्या कामांना गती देण्यासाठी होती. या कामासाठी 200 कोटी रुपये त्यांनी दिले आहेत ही वस्तुस्थिती खरी आहे. परंतु विस्तारित योजनेबाबत केलेले वक्तव्य साफ खोटे आणि दिशाभूल करणारे आहे.

कारण या योजनेला अद्याप कसलीही तांत्रिक मंजुरी, प्रशासकीय मंजुरी, त्याचे बजेट आणि अजूनही कॅबिनेट समोर विषय आलेला नाही. शिवाय कालच्या बैठकीला ज्यांच्याकडे जलसंपदा विभागाचे खाते आहे ते उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते. जलसंपदा खात्याचे सचिव, अधिकारी देखील उपस्थित नव्हते.

कर्नाटकने जत वर केलेल्या दाव्यानंतर येथील जनतेचा संभ्रम दूर व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांनी कदाचित हे वक्तव्य केले असावे. जोपर्यंत विस्तारित योजनेसाठी काँक्रीट असा निर्णय होत नाही, तोवर आम्ही विश्वास ठेवणार नाही. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने जत म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी स्वतंत्र बैठक घ्यावी. या बैठकीला तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, पाणी योजनांचे जाणकार , अभ्यासक व ज्यांनी संघर्ष केला अशा सर्वांना बोलावून ठोस कृतिशील कार्यक्रम जाहीर करावा अशी आमची मागणी आहे, असेही जगताप म्हणाले आहेत.

Related Stories

शाळा सुरू झाल्या आणि शिराळा बस स्थानक गेले गजबजून

Archana Banage

राज्यात २०२४ ला पुन्हा भाजप-रिपाईची सत्ता आणू : ना. रामदास आठवले

Archana Banage

सांगली : भिलवडी अंकलखोप सरपंचानी मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

Archana Banage

विटा येथे व्यवसाय सुरु करण्यासाठी व्यापाऱ्यांनी मागितली मागणी

Archana Banage

सांगली : होम आयसोलेशन नियमांचे उल्लंघन; जिल्ह्यात पाच जणांवर गुन्हे दाखल

Archana Banage

टेंभू चे पाणी तातडीने नेर्ली खोऱ्यात सुरू करा : राजाराम शिंदे

Archana Banage