Tarun Bharat

मुख्यमंत्र्यांची गोसावी मठाला भेट

Advertisements

मराठा समाजातर्फे बेंगळूरमध्ये सत्कार

प्रतिनिधी /बेळगाव

बेंगळूर येथील मराठा समाजाच्या गोसावी मठाला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱयानिमित्त सदिच्छा भेट दिली. कर्नाटकातील मराठा समाजासाठी विशेष योजना राबविल्याबद्दल तसेच अनुदान मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री बोम्माई यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्माई म्हणाले, मराठा समाज हा कधीही पराभव स्वीकारणारा नाही. मराठा समाज म्हणजे राष्ट्र रक्षणात सदैव पुढे राहणारा आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे योगदान अनन्यसाधारण आहे. मराठा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती शुल्कात वाढ करण्याच्या मुद्दय़ावर विचार करून लवकरच अंमलबजावणी केली जाईल. मराठा समाजाने समाजकरणात, राजकरणात पुढे आले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.  यावेळी बोलताना किरण जाधव म्हणाले, मराठा समाजाच्या विकासासाठी व समृद्धीसाठी राज्य शासनाने मराठा निगम मंडळाची स्थापना करून कोटय़वधी रुपयांचा निधी दिला आहे. अनुदानाची तरतूद करण्यात आली ही आनंदाची बाब आहे.

यावेळी गोसावी मठाचे मराठा समाजाचे श्री मंजुनाथ स्वामीजी, मराठा महामंडळ मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. जी. मुळे, सकल मराठा समाजाचे बेळगाव संघटक, भाजप प्रदेश ओबीसी मोर्चा सचिव किरण जाधव, गणेश केसरकर, रोहित साठे, मनोज शिंदे व मराठा समाजाचे प्रमुख उपस्थित होते.

Related Stories

डॉ. सतीश याळगी यांचा सत्कार

Patil_p

हल्याळ बसस्थानकाचे छत्रपती शिवाजी महाराजांचे नामकरण करा

Patil_p

ऑनलाईन शिक्षण! मग फी का आकारता?

Amit Kulkarni

बेळगाव जिह्यात शुक्रवारी 94 जणांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

स्नेहसंमेलनातून मुलींच्या कलागुणांना वाव

Patil_p

कोल्हापूरपेक्षा बेळगावमध्ये 9 रुपयांनी पेट्रोल स्वस्त

Patil_p
error: Content is protected !!