-आरोग्य विभाग सतर्क, कोल्हापुरातील रूग्णालयात उपचार सुरू
वार्ताहर / राजापूर
राजापूर शहरात तालिमखाना परिसरातील एका 4 वर्षीय बालकामध्ये पोलिओसदृश (जी. बी. सिंड्रोमची) लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे शहरात खळबळ उडाली असून आरोग्य विभाग अधिक सतर्प झाला आहे. या बालकावर सध्या कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
या बालकामध्ये पोलिओसदृश लक्षणे आढळून आली असून खबरदारी म्हणून या बालकाच्या घरापासून शहर व परिसरातील 5 किलोमीटर अंतरावरील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ डोस पाजला जाणार असल्याची माहिती राजापूर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम मेस्त्राr यांनी दिली. या बाबत तातडीने सर्वेक्षण हाती घेण्यात आल्याचेही डॉ. मेस्त्राr यांनी सांगितले.
राजापूर शहरातील तालिमखाना भागातील हा 4 वर्षे 4 महिने वयाचा बालक असून तो शहर बाजारपेठेतील एक अंगणवाडीत शिकत आहे. 8 ऑगस्टपासून त्याला ताप आला होता. त्यानंतर त्याच्या पालकांनी त्याला शहरातील खासगी डॉक्टरांकडे तपासले. आधी व्हायरल ताप असेल असे वाटत असतानाच या बालकाचे हात व पाय दुखण्यास सुरूवात झाली. त्यानंतर त्याला रत्नागिरीतील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तेथील वैद्यकीय अधिकाऱयांनी त्याला कोल्हापूर अथवा मुंबईत हलवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याला त्याच्या पालकांनी कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयात दाखल केले. 17 ऑगस्ट रोजी त्याला सीपीआर कोल्हापूर येथे दाखल करण्यात आल्याची माहिती डॉ. राम मेस्त्राr यांनी दिली.
या पोलिओसदृश आजारात अंग दुखू लागणे, चालताना तोल जाणे, चेहरा सुजणे, चावताना व गिळताना त्रास होणे व हातपाय लुळे पडणे अशा प्रकारची लक्षणे आढळून येतात. तशा प्रकारची काही लक्षणे या बालकामध्ये आढळून आली आहेत. अशा प्रकारे शहरात पोलिओसदृशची लक्षणे असलेला रूग्ण आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
तातडीने शहरात सर्वेक्षण
या घटनेनंतर आरोग्य यंत्रणा अधिक सतर्प झाली असून राजापूर ग्रामीण रूग्णालयाच्यावतीने तातडीने शहरात सर्वेक्षण हाती घेण्यात आहे. या रूग्णाच्या घरापासून 5 किलोमीटर परिसरातील 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओची लस पाजली जाणार असून शहरात सुमारे 500 बालके यासाठी पात्र आहेत. अशाप्रकारे रूग्ण आढळून आल्याने आपण अधिक सतर्प होणे व सतर्प रहाणे आवश्यक असून सर्व पालकांनी आपल्या शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पोलिओ डोस पाजून घ्यावा व आरोग्य कर्मचाऱयांना सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ. राम मेस्त्राr यांनी केले आहे.