आईवडिलांच्या प्रेमळ स्पर्शाची मुलांना गरज
अनेकदा भय, चिंता अणि वेदना या कारणांमुळे मुलांना झोपच येत नाही. अनेकदा डोक्यात एकामागोमाग एक विचार येत राहतात, यामुळे झोप लागणे अशक्य ठरते. अशा स्थितीत लहान मुले अधिक थकलेली असली तरीही झोपू शकत नाहीत. झोप लागणे गरजेचे असले तरीही मुलांना झोप मिळविणे जमत नसल्याची विरोधाभासी स्थिती निर्माण होते.
प्रत्यक्षात ही स्थिती संकटात अस्तित्वावरून शरीराला जागृत ठेवण्याची प्रत्युत्तरादाखल प्रतिक्रिया असते. परंतु झोपेसाठी मेंदूतील विचारांचे काहुर थांबण्याची गरज सते. अशा स्थितीत मुलांच्या आईवडिलांनी त्यांच्या भावना जाणून घेत त्यांच्याशी वागण्याची गरज असते. मुलांना ओरडून किंवा आदेश देऊन ती झोपी जात नाहीत, तर प्रेमळ स्पर्श आणि भावनिक आधार मुलांसाठी औषधाचे काम करतात.
भावनात्मक थकवा
भावनात्मक थकवा तणावाचेच एक रुप आहे, जे मुले आणि प्रौढ दोघांचीही झोप उडवून त्यांच्यात चिडचिडेपणा तयार करते. वैज्ञानिक स्वरुपात झोपेचा दबाव जितका अधिक असेल, तितकेच झोपणे सोपे ठरणार आहे. म्हणजेच बेडवर पडताच झोप लागणार आहे. इच्छा नसतानाही लहान मूल झोपी जाणार असल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे. मेंदूत एडिनोसायन्स केमिकल तयार झाल्याने असे घडते. हे एकप्रकारचे प्रोटीन असून जे आमच्या झोपेमुळे मेंदूतून हटते. आम्ही जागे होताच हे पुन्हा मेंदूत तयार होण्यास सुरुवात होते. मेंदूत याचे प्रमाण वाढल्यावर झोपेचा दबाव तयार होतो, प्रौढांमध्ये या प्रक्रियेत 14-16 तास लागतात, मुले एक ते दोन तासात पुन्हा झोपण्यासाठी तयार होतात.
शांत भाव दाखविणे सहाय्यभूत
मुलांना आरामदायी झोपविण्यासाठी स्पर्शाने गोंजारणे अत्यंत सहाय्यभूत ठरते. हळूहळू बोलणे, गाणे म्हणणे मुलांना झोपविण्यास मदत करते. मुलासमोर शांत भाव दाखविणेही त्यांना लवकर झोपी जाण्यास मदत करत असल्याचे मानसशास्त्रज्ञांचे सांगणे आहे.