कोविडच्या प्रसारामुळं मुलांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. तसेच लहान मुलांच्या लसीकरणाचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. असं जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफनं प्रकाशित केलेल्या अहवालात सांगितले आहे.
२०१९ ते २०२१ या काळात घटसर्प, धनुर्वात आणि दमा या लसीच्या तीन मात्रा मिळालेल्या मुलांध्ये सरासरी ५ टक्क्यांनी घट झाली आहे. हे प्रमाण ८१ टक्क्यांवर आलं आहे. त्याचप्रमाणे २५ दशलक्षपेक्षा अधिक मुलांना नियमित आरोग्य रक्षक यंत्रणेकडून एक किंवा दोन मात्राही मिळाल्या नाहीत. असे या अहवालात स्पष्ट केले आहे.