प्रतिनिधी /पणजी
दरवषी अखिल गोमंतकीय दैवज्ञ ब्राह्मण युवा संघटना ग्रामीण गोव्यात बालदिन साजरा करते. यंदा संघटनेतर्फे सांगे येथील प्राथमिक शाळेत बालदिन साजरा केला. यावेळी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलांसाठी रंगकाम, रेखाचित्र आणि चित्रकला यासारखे उपक्रम घेण्यात आले. संघटनेतर्फे ग्रामीण गोव्यातील दडलेल्या कलागुणांचा शोध घेऊन, कथा सांगून आणि कवितांचे पठण केले. याशिवाय विद्यार्थ्यांनीही आपली प्रतिभा दाखवली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहारासोबत ड्रॉईंग/पेन्सिल किट/पेयॉन इत्यादींचे वाटप केले. आरोग्य सेवा उपक्रमाचा एक भाग म्हणून अखिल गोमंतकीय दैवज्ञ ब्राह्मण युवा टीमने मुलांना हँडवॉश बाटल्यांसह शाळेला शैक्षणिक साहित्य आणि क्रीडा साहित्य प्रदान केले. पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. नाईक, शाळेचे मुख्याध्यापक अच्युत आणि अखिल गोमंतकीय दैवज्ञ ब्राह्मण युवा संघटनेचे सचिव रोहित वेर्णेकर यांच्या आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.