बीजिंग
हिंद-प्रशांत क्षेत्रात स्वतःची पकड मजबूत करण्याच्या उद्देशाने आता कंबोडियामध्ये सैन्यतळाची निर्मिती करत आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत या देशांची संघटना मुक्त हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी पुढाकार घेत असताना चीन स्वतःचे सामरिक प्रभुत्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. कंबोडियातील सैन्यतळामुळे चीनचा हिंद-प्रशांत क्षेत्रातील पहिला नौदल तळ निर्माण होणार आहे. पूर्व आफ्रिकन देश जिबूतीमध्ये नौदलाचा तळ निर्माण केल्यावर चीनचा हा दुसरा विदेशी सैन्यतळ असणार आहे.