तरुण भारत

ऑस्ट्रेलियावर चीनची नजर

वृत्तसंस्था/ कॅनबरा

अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत आणि जपानपासून आफ्रिकेतील सागरी भागांपर्यंत ड्रगनच्या कारवायांमुळे अनेक देश त्रस्त आहेत. याचदरम्यान चीन ऑस्ट्रेलियात हेरगिरी करत असल्याचा दावा तेथील संरक्षणमंत्री पीटर डटन यांनी केला आहे. चिनी टेहळणी नौका एक आठवडय़ापासून ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनाऱयावर नजर ठेवून असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Advertisements

चिनी टेहळणी नौका सैन्य आणि गोपनीय तळांनजीक दिसून आल्याचे डटन म्हणाले. 21 मे रोजी होणाऱया निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे विधान महत्त्वाचे ठरते. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन हे सुरक्षेचा मुद्दा उचलून धरत जाहीर सभांमध्ये चीनच्या विरोधात वातावरणनिर्मिती करत आहेत. मुख्य विरोधी पक्ष लेबर पार्टीला चीन आर्थिक मदत करत असल्याचा आरोप मॉरिसन यांच्या लिबरल पार्टीने केला आहे. चीनसोबतचे ऑस्ट्रेलियाचे संबंध तेथील निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे.

2019 आणि 2021 मध्ये अशाचप्रकारे एक चिनी नौका ऑस्ट्रेलियाच्या सैन्य मोहिमेवर नजर ठेवण्यासाठी दाखल झली होती. अशाप्रकारची टेहळणी आता मोठय़ा प्रमाणावर होऊ लागली आहे. विशेषकरून आशिया-प्रशांत आणि हिंद-प्रशांत क्षेत्रात अशाप्रकारची हेरगिरी वाढल्याने सामरिक शत्रुत्व देखील वाढत आहे.

Related Stories

विषाणूमधील म्युटेशन युरोपमधील दुसऱया लाटेचे कारण

Patil_p

कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होणे अशक्य : WHO

datta jadhav

इम्रान खानकडून तालिबानची भलावण

Amit Kulkarni

पुलवामा हल्ल्याची पाक मंत्र्याकडून कबुली

datta jadhav

इम्रान सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव

Patil_p

कोरोनाचा मूळ स्रोत कधीच समजणार नाही!

Patil_p
error: Content is protected !!