Tarun Bharat

चीनची पुन्हा अमेरिकेला धमकी

Advertisements

वृत्तसंस्था/ बीजिंग

तैवानसंबंधात अमेरिका धोकादायक संकेत देत आहे. त्यातून कोणताही अवांच्छनीय प्रसंग उद्भवल्यास चीन स्वस्थ बसणार नाही, अशी धमकी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी अमेरिकेला दिली आहे. यी यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांच्याशी टेलिफोनवरून तासभर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी ही भाषा वापरली, असे नंतर अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

तैवानचा मुद्दा हा चीनचा अंतर्गत प्रश्न आहे. अमेरिकेला त्यात हस्तक्षेप करण्याचा आणि तैवानचे संरक्षण करण्याची भाषा बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. अमेरिकेने या प्रश्नात हस्तक्षेप करू नये. तसे केल्यास चीनलाही आपले शक्तीप्रदर्शन करावे लागेल. यातून अधिक तणाव वाढण्याखेरीज काहीही साध्य होणार नाही. ऑगस्टमध्ये अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीगृहाच्या नेत्या नॅन्सी पॅलोसी यांनी तैवानचा दौरा केला होता. तेव्हापासूनच चीन आणि अमेरिकेत तणाव निर्माण झाला आहे. चीनने अमेरिकेला पुन्हा धमकी दिल्याने या तणावात आणखीन भर पडण्याची शक्मयता असून जगासमोर आणखी एक संकट उभे राहण्याचीही शक्यता नाकारता येत नाही, असे मत अनेक जागतिक तज्ञांनी व्यक्त केले आहे.

Related Stories

भारताकडून इम्रान खान यांचा फोन हॅक

datta jadhav

जगभरातील बाधितांची संख्या 7.5 कोटींवर

datta jadhav

म्यानमारमध्ये ‘लष्करी राजवट

Patil_p

मॉडर्ना लसीला मंजुरीची ट्रम्प यांची घोषणा

Patil_p

भेटण्याची अन् चर्चा करण्याची ही वेळ

Omkar B

पाणी वाचविणाऱया जीवाणूचा शोध

Amit Kulkarni
error: Content is protected !!