Tarun Bharat

चिप निर्मितीतील चीनचे प्रभुत्व संपणार

बिडेन यांची 200 अब्ज डॉलर्सच्या विधेयकाला मंजुरी ः अमेरिकेच्या कंपन्यांना होणार लाभ

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन

अमेरिकचे अध्यक्ष जो बिडेन यांनी मंगळवारी एका अत्यंत महत्त्वपूर्ण विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. या विधेयकाद्वारे अमेरिका आता चीनच्या सेमीकंडक्टर आणि चिप निर्मितीतील दबदबा संपविणार आहे. 200 अब्ज डॉलर्सच्या या विधेयकाद्वारे या क्षेत्रात चीनला मागे टाकण्यासाठी अमेरिकेच्या कंपन्यांना मदत केली जाणार आहे. चीनचे या क्षेत्रातील वर्चस्व मोडून काढल्यास भारतालाही हे लाभदायक ठरणार आहे. चीन या वर्चस्वाद्वारे कुठल्याही देशातील उद्योगाला धक्का पोहोचविण्याची क्षमता बाळगून आहे.

Semiconductor chips are seen on a circuit board of a computer in this illustration picture taken February 25, 2022. REUTERS/Florence Lo/Illustration

चीन आणि तैवान यांच्यात सुरू असलेल्या वादादरम्यान जगासमोर सर्वात मोठे संकट याच सेमीकंडक्टर आणि चिपवरूनआहे. चीनने तैवानवर हल्ला केल्यास सेमीकंडक्टर आणि चिपचा पुरवठा सुमारे 70 टक्क्यांनी कमी होणार आहे. तैवान 63 तर चीन सुमारे 7 टक्के सेमीकंडक्टर आणि चिप तयार करतो.

चिप्स अँड सायन्स ऍक्ट नावाच्या या विधेयकात अमेरिकेच्या कंपन्यांना 200 अब्ज डॉलर्सचा निधी वितरित केला जाणार आहे. याच्याद्वारे 5 वर्षांमध्ये अमेरिकेच्या कंपन्या चीनला मागे टाकू शकतील. कोरोना काळात अमेरिकेसह जगातील अनेक मोबाइल आणि कारनिर्मात्या कंपन्यांसमोर या चिप्समुळे मोठे संकट उभे ठाकले होते. या कंपन्यांचे उत्पादनच ठप्प पडले होते.

आजपासून 50 किंवा 100 वर्षांनंतरही जग हे विधेयक आणि ते संमत करण्याची तारीख आठवणार आहे. हे विधेयक अत्यंत महत्त्वाचे असल्यानेच डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक पार्टी दोघांनीही याला पूर्ण समर्थन दिल्याचे उद्गार बिडेन यांनी काढले आहेत.

रोजगारनिर्मिती

एका आकडेवारीनुसार या विधेयकामुळे अमेरिकेत 40 हजार नोकऱया निर्माण होणार आहेत. यापूर्वी बिडेन प्रशासनाने या उद्योगक्षेत्रासाठी 50 अब्ज डॉलर्सचा निधी दिला होता. विधेयकाद्वारे 200 अब्ज डॉलर्स देण्यात येणार असून ते पूर्णपणे सेमीकंडक्टर आणि चिप निर्मिती आणि संशोधनावर खर्च होणार आहेत. अमेरिकेतील सर्व मोठय़ा इलेक्ट्रॉनिक कंपन्या नव्याने यावर संशोधन आणि निर्मिती सुरू करतील. या प्रकल्पाचा आराखडा पूर्वीच तयार करण्यात आला असल्याने यावर अत्यंत लवकरच काम सुरू होणार असल्याचे मानले जातेय.

चिप अन् सेमीकंडक्टरचे महत्त्व

तैवानवर चीनने हल्ला केल्यास जगभरातील मोबाइल आणि वाहनउद्योगासमोर मोठे संकट उभे ठाकणार आहे. जगातील 90 टक्के अत्याधुनिक सेमीकंडक्टर तैवानमध्येच तयार होतात. मागील वर्षी तैवानने 118 अब्ज डॉलर्सची निर्यात केवळ सेमीकंडक्टर श्ा़sखणीत केली होती. टीएसएमसी म्हणजेच तैवान सेमीकंडक्टर मॅन्यूफॅक्चरिंग कंपनी जगातील सर्व दिग्गज कंपन्या म्हणजेच ऍपल, एएमडी, एनवीडिया, एआरएम यांना चिप्सचा पुरवठा करते.

तैवानवर अवलंबून कंपन्या

मोबाइलपासून लॅपटॉप आणि घडय़ाळांपासून मोबाइल गेमपर्यंत, दैनंदिन गरजेच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये बसविण्यात येणाऱया सेमीकंडक्टर चिपचा तैवान सर्वात मोठा पुरवठादार आहे. तैवानमधील टीएसएमसी जगातील एकूण सेमीकंडक्टर चिपचे निम्म्याहून अधिक उत्पादन करते. तैवानवर कब्जा करण्यास चीनला यश आल्यास तो जगातील सर्वात महत्त्वपूर्ण उद्योगावर नियंत्रण मिळवू शकतो. तैवानवर हल्ला करण्यामागे चीनसाठी हे देखील महत्त्वाचे कारण ठरू शकते.

Related Stories

‘नोरो’ विषाणूने वाढवली धास्ती

datta jadhav

जपानमध्ये परततोय किडे खाण्याचा ट्रेंड

Patil_p

ट्रकचालकांचा घेराव, कॅनडाचे पंतप्रधान भूमिगत

Patil_p

ट्विटरकडून 50 टक्के कर्मचाऱयांची कपात

Patil_p

वाहनांची अंत्यभूमी

Patil_p

शेपूट वाकडे ते वाकडेच!

Patil_p