वैयक्तिक डेटा लीक होण्याची शक्यता
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्ली एम्स सर्व्हर हॅकिंग प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. हॅकिंगची चौकशी करणाऱया अधिकाऱयांनी चीनकडे लक्ष वेधले आहे. एम्सचे 5 सर्व्हर हॅक झाल्याचे सांगण्यात आले. ‘आयएफएसओ’च्या मते, हॅकिंग दरम्यान वैयक्तिक डेटा देखील लीक झाला आहे. हा डेटा डार्क वेबच्या मुख्य डोमेनवर देखील असण्याची शक्मयता आहे. साहजिकच देशातील व्हीव्हीआयपींसह लाखो रुग्णांचा गुप्त डेटा लीक होण्याची शक्मयता बळावली आहे. तथापि, या संपूर्ण प्रकरणात कोणत्याही प्रकारची तडजोड झाली नसल्याचा दावा अधिकाऱयांनी केला आहे.
गेल्या मंगळवारी एम्स दिल्लीचा सर्व्हर हॅक करणाऱयांनी 200 कोटींची मागणी केली होती. हॅकर्सनी क्रिप्टोकरन्सीमध्ये पेमेंट करण्यास सांगितले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी कोणत्याही प्रकारची खंडणी देण्यास नकार दिला होता. सायबर हल्ल्यामागे दोन चिनी गट कार्यरत असल्याची माहिती तपास अधिकाऱयांकडून देण्यात आली आहे. या हल्ल्यामागे सम्राट ड्रगनफ्लाय आणि ब्राँझ स्टारलाईट (डीईव्ही-0401) हे दोन चिनी रॅन्समवेअर गट सायबर हल्ल्यामागे असू शकतात, अशी शक्यता सायबर तज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र, त्याची पुष्टी होणे बाकी आहे. दुसरा संशयित लाईफ नावाचा गट असून तो ‘वानारेन’ नावाच्या रॅन्समवेअरची नवीन आवृत्ती असल्याचे मानले जाते. त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने हॅकर्सनी डेटा डार्क वेबवर विक्रीसाठी ठेवण्यास सुरुवात केली असावी, असेही तपासात दिसून आले आहे. डार्क वेब हा इंटरनेट शोधाचा भाग आहे, परंतु तो सामान्यतः सर्च इंजिनवर आढळू शकत नाही. अशाप्रकारची साईट उघडण्यासाठी, एक विशेष ब्राऊझर आवश्यक असते, त्याला ‘टॉर’ असे म्हणतात. डार्क वेबच्या साईट्स टॉर एन्क्रिप्शन टूलच्या मदतीने लपवल्या जातात.