Tarun Bharat

चीनचे अध्यक्ष जिनपिंग स्थानबद्ध?

Advertisements

सेशल मीडियावर वृत्तांना ऊत, अधिकृतता मात्र अद्याप नाही

बीजिंग / वृत्तसंस्था

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासंबंधी सध्या बरीच उलटसुलट चर्चा आहे. त्यांना सेनाध्यक्षदावरून हटविण्यात आले असून त्यांच्या निवासस्थानी स्थानबद्ध करुन ठेवण्यात आले आहे, अशा वृत्तांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मात्र, नेमकी स्थिती काय आहे, यासंबंधी अधिकृत स्पष्टीकरण मात्र देण्यात आलेले नाही. त्यामुळे चर्चांना अधिकच खतपाणी मिळताना दिसून येत आहे.

सध्या ‘क्षी जिनपिंग’ हा हॅशटॅग बराच गजबजलेला आहे. यावर हजारो लोकांनी जिनपिंग यांच्या स्थितीवर आशय प्रसिद्ध केला आहे. भारतातील राजकीय नेते सुब्रम्हणियम स्वामी यांनीही या हॅशटॅगवर आपले मत व्यक्त केले असून जिनपिंग यांच्या संदर्भात बरीच माहिती प्रसिद्ध केली जात आहे. त्यांना बीजिंगमध्येच स्थानबद्ध करण्यात आले असून कोणालाही भेटण्याची अनुमती देण्यात येत नाही. त्यांना राजकीय वक्तव्य करण्यासही प्रतिबंधित करण्यात आले आहे. ते आता चीनचे सैन्यप्रमुख राहिलेले नाहीत. त्यांची या पदावरुन उचलबांगडी करण्यात आली असून लवकरच नवे सेनाप्रमुख घोषित होतील, अशी चर्चा आहे.

स्पष्टीकरण नाही

सर्वसाधारणपणे चीनसंबंधी कोणतीही चर्चा होत असली तरी या चर्चेवर त्वरित चीनच्यी अधिकृत प्रसार माध्यमे प्रतिक्रिया देतात. जे बोलले जात आहे त्याचे एकतर समर्थन तरी केले जाते, किंवा खंडन केले जाते. मात्र या वृत्ताचे चीनच्या अधिकृत मीडियाकडून समर्थनही करण्यात आलेले नाही किंवा खंडनही करण्यात आलेले नाही. त्यामुळे गेधळात अधिकच भर पडली असल्याचे दिसून येते.

हे चीनचेच तंत्र?

कोणत्या ना कोणत्या मार्गाने चीन आंतरराष्ट्रीय वृत्तमाध्यम आणि सोशल मीडियावर चर्चेत रहावा, यासाठी चीननेच हे वृत्त प्रसारित केले आहे, असे अनेकांचे मत आहे. चीनचा अशा संदर्भातील इतिहास पाहता अनेक तज्ञांचे हे अनुमान पूर्णतः अनाठायी म्हणता येणार नाही. तथापि, हा खेळ इतका काळ लांबविण्याचे चीनला कारण नव्हते. 48 तासांमध्ये या वृत्तांचे खंडन चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांकडून करण्यात आले असते, असे ही वृत्त विश्वासार्ह मानणाऱयांचे मत आहे. एकंदर स्थिती अस्पष्ट असल्याने रंगतदार बनली आहे.  

वृत्त पसरले कसे?

जिनपिंग यांना जवळचे असणारे चीनचे मंत्री सन लिऊन यांना भ्रष्टाचार प्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानी साधारणपणे 9 कोटी डॉलर्सचा (साधारणतः 700 कोटी रुपये) भ्रष्टाचार संरक्षण व्यवहारांमध्ये केल्याचे उघड झाल्याने त्यांच्यावर अभियोग चालविण्यात आला होता. त्यात दोषी ठरण्यानंतर त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ऐकविण्यात आली. त्यानंतरच क्षी जिनपिंगही स्थानबद्ध असल्याचे वृत्त जगभरात पसरले. ते विश्वसनीय मानणाऱयांची संख्या सध्या कमी आहे. मात्र, चीनमध्ये काहीही घडू शकते हे सत्य असल्याने जिनपिंग स्थानबद्ध असणे अगदीच अशक्य नाही, हे मानणारेही मोठय़ा संख्येने आहेत.

Related Stories

सरकार स्थापण्यासाठी नेपाळ काँग्रेस प्रयत्नशील

Patil_p

तालिबानही पाकिस्तानवर संतप्त

Patil_p

वृद्धापकाळातही दिसता येणार तरुण

Patil_p

120 वर्षांपर्यंत जगू शकणार माणूस

Patil_p

फिलिपीन्समध्ये बॉम्बस्फोट; 14 ठार

datta jadhav

चीनमध्ये मिळाला नवा विषाणू

Patil_p
error: Content is protected !!