Tarun Bharat

चीनची हेरगिरी नौका श्रीलंकेत दाखल

Advertisements

16-22 ऑगस्टपर्यंत हंबनटोटा बंदरावर राहणार ः नौकेच्या हालचालींवर भारतीय नौदलाची नजर

वृत्तसंस्था/ हंबनटोटा

चीनची हेरगिरी करणारी नौका युआन वांग-5 मंगळवारी सकाळी श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरावर पोहोचली आहे. ही हेरगिरी करणारी नौका 16-22 ऑगस्टपर्यंत तेथे राहणार आहे. या नौकेच्या माध्यमातून सुमारे 750 किलोमीटर अंतरापर्यंत सहजपणे देखरेख ठेवता येते. युआन वांग 5 ही नौका उपग्रह आणि आंतरखंडी क्षेपणास्त्रांना ट्रक करण्यास सक्षम आहे.

चीनची ही नौका पूर्वी 11 ऑगस्ट रोजी हंबनटोटा येथे पोहोचण्याची अपेक्षा होती. हेरगिरीचा धोका पाहता भारताने यासंबंधी श्रीलंकेकडे आक्षेप नोंदविला होती. प्रत्यक्षात हंबनटोटा बंदरापासून तामिळनाडूचे कन्याकुमारीपर्यंतचे अंतर सुमारे 451 किलोमीटर आहे. तरीही श्रीलंकेने चिनी नौकेला या हंबनटोटा बंदरावर येण्याची अनुमती दिली. भारत या नौकेच्या बाबतीत आता अलर्ट मोडवर आहे. भारतीय नौदलाची या नौकेच्या हालचालींवर करडी नजर आहे.

चीनमधून युआन वांग 5 नौकेला हंबनटोटा बंदरासाठीचा प्रवास रोखण्याची सूचना श्रीलंका सरकारने केली होती. 12 ऑगस्ट रोजी चिनी दूतावासाने श्रीलंकेच्या विदेश मंत्रालयाला एक पत्र पाठविले. यात युआन वांग 5 नौका 16 ऑगस्ट रोजी हंबनटोटा बंदरावर पोहोचणार असल्याचे नमूद होते.

चीन आणि श्रीलंकेतील सहकार्य दोन्ही देशांनी स्वतंत्रपणे निवडले आहे. तसेच हे सहकार्य त्रयस्थ देशाला लक्ष्य करत नाही. सुरक्षा चिंतांच्या मुद्दय़ांचा दाखला देत श्रीलंकेवर दबाव टाकणे तर्कहीन असल्याचा दावा चीनने केला आहे.

युआन वांग 5 ची 2007 मध्ये निर्मिती करण्यात आली होती. ही नौका सैन्यासाठी नसली तरीही शक्तिशाली ट्रकिंग शिप आहे. चीन किंवा अन्य कुठलाही देश क्षेपणास्त्र चाचणी करत असल्यास या नौकेचा प्रवास सुरू होतो. ही नौका सुमारे 750 किलोमीटर अंतरावरून सहजपणे नजर ठेवू शकते. 400 सदस्य असणारी ही नौका पॅराबोलिक ट्रकिंग अँटेना आणि अनेक सेन्सर्सनी युक्त आहे.

नौदलाचे तळ चीनच्या रडारच्या कक्षेत

हंबनटोटा बंदरावर पोहोचलेल्या या नौकेची हेरगिरी कक्षेत आता दक्षिण भारतातील प्रमुख सैन्य आणि आण्विक केंद्र म्हणजेच कलपक्कम, कुडनकुलम येणार आहे. तसेच केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेशातील अनेक बंदरे चीनच्या रडारवर असतील. चीन भारताचे मुख्य नौदल तळ आणि आण्विक प्रकल्पांच्या हेरगिरी करू पाहत असल्याचे काही तज्ञांचे मानणे आहे. 

उपग्रह टॅकिंगमध्ये तरबेज

चिनी नौका युआन वांग-5 ला अंतराळ आणि उपग्रह ट्रकिंगमध्ये प्राविण्य प्राप्त आहे. चीन युआन वांग श्रेणीच्या नौकेद्वारे उपग्रह, रॉकेट आणि आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आयसीबीएमच्या प्रक्षेपणाला ट्रक करू शकतो. ही नौकेचे संचालन पीपल्स लिबरेशन आर्मीची स्ट्रटेजिक सपोर्ट फोर्स म्हणजेच एसएसएफ करते. एसएसएफ थिएटर कमांडर पातळीवरील संघटना आहे. पीएलएला अंतराळ, सायबर, इलेक्ट्रॉनिक, इन्फॉर्मेशन, कम्युनिकेशन आणि सायकोलॉजिकल वॉरफेयर मिशनमध्ये एसएसएफ मदत करते.

Related Stories

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 60 लाखांच्या उंबरठ्यावर

datta jadhav

नेपाळकडून होणारी मालवाहतूक चीनने रोखली

Patil_p

अमेरिकेत आता आढळतायत ‘सायक्सोस्पोरा’चे रुग्ण

datta jadhav

शरीरातील कोरोनाचा ‘मित्र अन् शत्रू’ उघड

Patil_p

ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 75 लाखांसमीप

datta jadhav

इजियूम शहर रशियाच्या ताब्यातून मुक्त

Patil_p
error: Content is protected !!