रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत विविध प्रकारचे प्रशिक्षण देणार
प्रतिनिधी /बेळगाव
रोजगारासाठी बेळगावात स्थलांतर झालेला आंध्रप्रदेशमधील आदी जांबव मादिग समाज आजही मागासलेला आहे. समाजाच्या विकासासाठी आणि शैक्षणिक विकासासाठी आझमनगर येथील सफाई कर्मचारी कॉलनी येथे चिंतन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करून रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशिक्षणाबाबत माहिती देण्यात आली.
100 वर्षापूर्वी हा समाज बेळगावात स्थलांतर झाला. पण आजही शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. समाजातील मुलांना शिक्षण देण्यासह बेरोजगारी दूर करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. महिलांसाठी संगणक प्रशिक्षण, शिलाई प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी चिंतन सभेच्या अध्यक्षस्थानी स्वच्छता कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष मुनीस्वामी भंडारी होते. जिल्हा स्वच्छता कर्मचारी, दक्षता नियंत्रण समितीचे सदस्य विजय निरगट्टी, उपाध्यक्ष महेश मळगी, मालती सक्सेना, अऊणा साके, मोहन पुजारी, सुरेश हेगडे, यल्लाप्पा अनंतपूर, राममोहन साके, कुमार हरिजन, इराण्णा अनंतपूर, उमेश पुजारी, ऊक्मिणी बेल्लारी, मोहन साके, शाम बेळ्ळारी, अजय शहापूरकर व इतर सदस्य उपस्थित होते.