Tarun Bharat

चिपळूण हायटेक बसस्थानकाचे काम आठ दिवसांत सुरू?

सातारा येथील ठेकेदारास मिळाला ठेका, अधिकाऱयांसह ठेकेदाराने अर्धवट बांधकामाची केली पाहणी

चिपळूण

  करोडो रुपये खर्चून ‘हायटेक’ धर्तीवर शहरातील मध्यवर्ती बसस्थानक उभारण्याचे काम गेली चार वर्षे रखडले आहे. गेल्या पाच वर्षात या बंधकामाचा पायादेखील पूर्णत्वास गेलेला नाही. असे असताना आता नोव्हेंबर महिन्यात आठवडाभरात या कामाला सुरूवात करण्याच्या कामाला बऱयाच प्रतीक्षेनंतर मुहूर्त मिळाला आहे. या रखडलेल्या बसस्थानक प्रश्नी सातत्याने आवाज उठवल्यानंतर या बांधकामाची अखेर नव्याने निविदा काढण्यात आली असून एसटी महामंडळाने सातारा येथील ठेकेदारास या बांधकामाचा ठेका देला आहे. 

  प्रवासी वाहतुकीचे मुख्य पेंद्र असलेल्या येथील मध्यवर्ती बसस्थानकाची जीर्ण इमारत तोडून त्याठिकाणी हायटेक सर्व सोयी-सुविधायुक्त असे अत्याधुनिक बसस्थानक उभे करण्यास खऱयाअर्थाने 2018 मध्ये प्रारंभ झाला. विशेष म्हणजे प्रत्यक्ष पुनर्बांधणीचे काम सुरुवातीपासूनच धिम्यागतीने सुरू झाले. पूर्वीच्या ठेकेदारासह महामंडळानेदेखील सातत्याने चालढकल केल्याने गेल्या पाच वर्षात या बसस्थानकाचा एकही पिलर उभा राहिलेला नाही. अशातूनच बसस्थानकाच्या बांधकामाचा खऱयाअर्थाने बट्टय़ाबोळ उडाला. रखडलेल्या या पुनर्बांधणीच्या कामासाठी खुद्द एस.टी. प्रशासनाकडून पाठपुरावा न झाल्याने यातूनच महामंडळाची निष्क्रियता स्पष्ट झाली.

   या हायटेक बसस्थानकाच्या बांधणीसाठी बसस्थानकातील मोठी जागा व्यापून गेल्याने उर्वरित अपुऱया जागेत आगार प्रशासनाचा कसाबसा कारभार चालवला जात आहे. इतकेच नव्हे तर जागेअभावी प्रवासी हंगामात प्रवाशांना जागेअभावी चांगली सेवा मिळत नसल्याने एकूणच हे हायटेक बसस्थानक प्रवाशांना एकप्रकारे डोकेदुखी ठरले आहे. यानंतर कायमच याकडे दुर्लक्ष झाल्याने आजही हे बसस्थानक झाडीझुडपांनी वेढल आहे. अशी विदारक स्थिती असतानाच या रखडलेल्या बसस्थानकाचे काम पूर्णत्वास जावे यासाठी शिवसेना, काँग्रेसने आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. शिवाय इतर राजकीय पक्षांनीही संबंधित अधिकाऱयांना निवेदने देऊन बांधकाम सुरु करण्याची मागणी केली होती.

   या हायटेक बसस्थानक प्रश्नी सातत्याने ओरड झाल्याने अखेर एसटी महामंडळाने पूर्वीच्या ठेकेदाराचा ठेका रद्द करुन रखडलेल्या या बसस्थानकाची नव्याने निविदा काढली होती. त्यानुसार या हायटेक बसस्थानकाचा ठेका सातारा येथील शिवाजी कदम यांना मिळाला आहे. कदम यांनी काही महिन्यांपूर्वी चिपळुणात येऊन या रखडलेल्या अर्धवट बसस्थनकाची एस.टी. अधिकाऱयांसह पहाणी केली आहे. त्यानुसार आता या बसस्थानकाच्या कामाला खऱया अर्थाने नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात सुरूवात करण्याचा मुहूर्त मिळाला असून या महिन्यात प्रत्यक्ष बसस्थानकाची स्वच्छता करून बांधकामास सुरुवात होणार आहे.

   तसे पाहिल्यास गेल्या पाच वर्षापासून रखडलेल्या या बसस्थानकाचा पायादेखील पूर्णत्वास गेलेला नसून वापरण्यात आलेले लोखंड पूर्णतः गंजले आहे. त्यामुळे ते वापरण्यास योग्य नसून आता नव्यानेच पाया खोदाई करून वापरण्यात आलेले सर्व लोखंड भंगारात काढून सर्व काम नव्याने करावे लागणार आहे.

Related Stories

वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयास प्राप्त झालेल्या अँब्युलन्सचा लोकार्पण सोहळा संपन्न

Anuja Kudatarkar

जुनाट वृक्षांचे होणार संवर्धन

NIKHIL_N

शक्यता जिल्हय़ातील 441 शाळा बंद होण्याची

NIKHIL_N

गवारेड्याच्या हल्ल्यात ५५ वर्षीय प्रौढ जखमी

Anuja Kudatarkar

विनापरवाना बंदूक बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

Archana Banage

गणपती गेले गावाला…!

Patil_p