Tarun Bharat

सोलर फेरीबोटीचा फ्लोटरमुळे चोडणवासियांसमोर संकट

वार्ताहर/ जुने गोवे

 माडेल चोडण येथील फेरी बोट धक्क्याजवळ बांधून ठेवलेला फ्लोटर नदी परिवहन खात्याने त्या जागेवरुन त्वरित हलवावा अशी मागणी चोडणच्या नागरिकांनी केली आहे. हा फ्लोटर चोडणावासियांसमोर मोठे संकट निर्माण झाले असून त्याचा रात्रीच्यावेळच्या प्रवाशांना फटका बसू शकतो.

   मिळालेल्या माहितीनुसार असे समजते की, काही दिवसांपूर्वी नदी परिवहन खात्याने नवीन सोलर फेरी बोटी चे उद्घाटन केले होते व नवीन सोलर फेरी बोट माडेल चोडण ते पणजी अशी प्रवाशांची वाहतूक करणार असल्याचे हा फ्लोटर माडेल चोडण येथील फेरी धक्क्याजवळ आणून ठेवण्यात आला आहे.सोलर फेरी बोट अजून काही सुरवात झाली नाही. पण या फ्लोटर मुळें रात्रीच्या वेळी या जलमार्गावरील नियमित फेरी बोटी चोडणच्या बाजूला बांधून ठेवता येत नाही. आणीबाणीच्या प्रसंगी चोडणच्या नागरिकांना चोडणच्या बाजूने गरज पडल्यास त्यांनी काय करावे असा प्रश्न विचारण्यात येत आहे.                                                                मयें मतदार संघाचे आमदार श्री प्रेमेंद्र शेट व चोडणचे सरपंच श्री पंढरी वेर्णेकर यांनी ताबडतोब या विषयांत लक्ष घालून सदरचा फ्लोटर नदी परिवहन खात्याला त्या जागेवरुन हलविण्यास त्वरित भाग पाडावे अशी मागणी चोडणच्या नागरिकांनी केली आहे.

Related Stories

पेट्रोल व डिझेलची शंभरीकडे वाटचाल

Amit Kulkarni

अमेरिकेतील हौस्टन येथे चांदरच्या युवकाचा खून

Amit Kulkarni

पर्येतील रस्त्यांची कामे लवकरच

Amit Kulkarni

सत्तरीत तालुक्याला वादळी वाऱयाचा फटका

Amit Kulkarni

विकास प्रक्रियेत सर्वांचे सहकार्य अपेक्षित

Amit Kulkarni

गोव्यातील जनतेसमोर आता काँग्रेस हाच एकमेव पर्याय

Amit Kulkarni